मुकूटबन ग्रामपंचयातचे स्वच्छते कडे विशेष लक्ष

 ग्रामस्वच्छतेकडे विशेष लक्ष देणारी जिल्ह्यात पहिली ग्रामपंचायत

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायात म्हणून ओळख असलेल्या मुकूटबन गावात ग्रामस्वच्छतेकडे विशेष लक्ष देत असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामपंचयातीमध्ये १५ सदस्य व एक सचिव अशी बॉडी असून सरपंच उपसरपंच व सदस्य एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी झटत आहे. गावातील जनतेला शुद्ध पाण्याचे तीन आरो प्लांट बसविण्यात आले. पावळ्यापूर्वी गावातील पाचही वॉर्डातील नाल्याची सफाई करण्यात आली. आठवड्यातून एकदा प्रत्येक वॉर्डातील नाली साफ केली जाते.

नाल्या सफाईकरिता ग्रामपंचयातीने वेगळी टीम तयार करून हे कार्य करीत आहे. त्यात ७ ते ८ गावातीलच कामगार ठेवण्यात आले. प्रत्येक वॉर्डात, चौकात, पान टपरीवरव, दुकानासमोर प्लास्टिक तसेच खर्रा पनी व इतर कचरा फेकला जात होता. रस्त्यावर चौकात कचऱ्याचे ढिगारे दिसत होते. मच्छर, डास यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे ग्रामवासीयांच्या आरोग्यावर परिणाम होत होते.

जनतेला वेगवेगळ्या आजाराचा सामना करावा लागत होता. या सर्व गोष्टींचा विचार करून ग्रामपंचयातीने लाखो रुपये खर्च करून गावातील २ हजार कुटुंब व दुकानदारांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले. गावकऱ्यांच्या घरातील दुकानातील ओला व सुखा कचरा डस्टबिन मधे भरून कचरा गाडीत टाकण्याचे ग्रामपंचायतने सक्तीचे केले आहे. कचरा भरून नेण्याकरिता गाडीची व्यवस्था करण्यात आली. दर चार दिवसात एकदा प्रत्येक वॉर्डातील घरासमोर कचरा गाडी येऊन कचरा घेऊन जात आहे.

कचरा रस्त्यावर किंवा उघड्यावर टाकल्यास कायद्याने कार्यवाहीसुद्धा होणार आहे. कचरा गाडीचालक गाडीवर लाऊड स्पीकर (भोंगा) लावून गावकऱ्यांना आवाज देत कचरा जमा करून घेऊन जातो. ज्यामुळे मुकुटबन गाव ७०टक्के पेक्षा जास्त स्वछ झाल्याचे दिसत आहे. कचऱ्याचे ढिगारे व घरातील ओला व सुखा कचरा गावबाहेर नेत असल्याने गाव स्वछ होत आहे.

आरोग्याचा प्रश्न सुटत आहे. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचयात असून येथील लोकसंख्या १३ हजार जवळपास आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात पाणी,आरोग्य व स्वछतेकडे विशेष लक्ष देणारी मुकूटबन ग्रामपंचायतचे नाव जिल्ह्यात लौकिक आहे. व जिल्ह्यात प्रथम असल्याचेही बोलले जात आहे.

गावाच्या विकासाकरिता सरपंच शंकर लाकडे उपसरपंच अरुण आगुलवार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मधुकर चेलपेलवार सचिव कैलास जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य , पत्रकार व इतर पक्षातील पदाधिकारी व ग्रामवासी यांच्या सहकार्यने होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.