क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल

राजूर काॅलरी येथे विविध स्पर्धा, शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त राजूर काॅलरीत 3 ते 5 जानेवारी या काळात 3 दिवसीय कार्यक्रम होणार आहेत. महिला समारोह समिती व बहुजन स्टुडंट्स फेडरेशनचे हे आयोजन आहे. तत्पूर्वी दिनांक 25 डिसेंबरला सामान्य ज्ञान परीक्षा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेलाही भरभरून प्रतिसाद मिळाला.

दिनांक 3 जानेवारी 2023 ला सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत सावंगी मेघे येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थानचे सर्व रोग निदान व उपचार शिबिर होईल. तसेच सकाळी 10 वाजता शालेय चमूसह मिरवणूक निघेल. नंतर लगेच 11 वाजता आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार कार्यक्रमाचं उद्घाटन करतील.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक वानखडे तर स्वागताध्यक्ष विजय चोरडिया राहतील. राज गुमनार, निकिता ठाकरे, संघदीप भगत, विद्या पेरकावार, अश्विनी बलकी, वसुंधरा गजभिये, वृषाली खानझोडे, प्रणिता असलम, दर्शना मानवटकर, सरोज भंडारी, वामन पाटील बलकी, धानोरकर, प्रदीप शिरस्कर, ललिता बोदकुरवार, कवरलाल पुरोहित, महेंद्र श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित राहतील.

सायंकाळी 6 वाजता दृष्टिबाधित मुलांचा ऑर्केस्ट्रा चेतन सेवांकुर आणि संच सादर करतील. दिनांक 4 जानेवारी 2023 ला सायंकाळी 6 वाजता नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत नाव नोंदविण्यासाठी 8657412389 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. दिनांक 5 जानेवारी 2023 ला सायंकाळी 6 वाजता प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा जाहीर समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सर्व रोग निदान आरोग्य शिबिर, दृष्टिबाधित मुलांचा आर्केस्ट्रा, नृत्य स्पर्धा, सत्यपाल महाराजांचे प्रबोधनपर कीर्तन आदी सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती आयोजन समितीने केली आहे.

Comments are closed.