गुरुवारी नाट्य मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा तथा प्रा. हेमंत चौधरी यांचा सत्कार

सागर झेप बहुद्देशीय संस्था आणि नगर वाचनालयाचं आयोजन

0 111

बहुगुणी डेस्क, वणी: नगर वाचनालय आणि सागर झेप बहुद्देशीय संस्थेच्या वतीने गुरुवारी स्वातंत्र्यदिनाला नाट्य मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. या सोहळ्यात पु. ल. देशपांडे एकपात्री प्रयोगस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल प्रा. हेमंत चौधरी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होईल . नगर वाचनालय येथे दुपारी ३.३० वाजता हा सोहळा होईल, असे संस्थेच्या वतीनं सागर मुने यांनी कळविले आहे.

या शिबिरात नागपूरचे नाट्यराज्य पुरस्कार प्राप्त अभिनेता , दिग्दर्शक गौरव श्रीरंग व नाट्य दिग्दर्शक, नेपथ्यकार, पार्श्वसंगीतकार सुशील सरोदे हे प्रशिक्षण देणार आहेत. तरी सर्व नाट्य रसिकांनी या नाट्य कार्यशाळेचा लाभ घ्यावा तसेच महाराष्ट्र शासन पु ल देशपांडे एकपात्री अभिनय स्पर्धेत पारितोषिक विजेते प्रा. हेमंत चौधरी यांच्या सत्कार समारंभ साठी आपण सर्वांनी उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

Comments
Loading...