अनिस हॉलसमोर आढळलेला मृतदेह कुणाचा?

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ रोडवरील अनिस हॉलसमोर अंदाचे 65 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. रविवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास हा मृतदेह दिसला. मृतकाच्या अंगावर लाल रंगाचा शर्ट, भुरकट रंगाची पॅण्ट होता. त्या इसमाची दाढी वाढलेली होती. ती व्यक्ती भीक मागून उदरनिर्वाह करीत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. वृत्त लिहेपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. … Continue reading अनिस हॉलसमोर आढळलेला मृतदेह कुणाचा?