नवघरे परिवाराची ज्येष्ठ गौरीपूजनाची १०५ वर्षांची परंपरा

महालक्ष्मी पूजनाची गुरुवारी सांगता नि विसर्जन

0

विवेक तोटेवार,वणी: गणेशचतुर्थी नंतर भाद्रपद शुक्ल सप्तमीला संपूर्ण देशभरात मोठ्या हर्ष व आनंदाने सुख, समृद्धी व शांती देणाऱ्या महालक्ष्मी (ज्येष्ठ गौरी)ची स्थापना केली जाते. या वर्षालादेखील दि. 22 ऑगस्टरोजी महालक्ष्मी मातेची स्थापना झाली. रामेश्वर नवघरे यांच्याकडे मागील तीन पिढ्यांपासून चालत आलेल्या परंपरेला या वर्षी १०५ वर्षे पूर्ण होत आहेत.

पणजोबा,आजोबा, वडील आणि आता स्वतः अशा पिढ्यांची परंपरा अविरतपणे सुरू ठेवली. सुरवातीला घरातील आर्थिक परिस्थिती बिकट व हलाकीची होती. तरी मिळेल ते काम करून मिळणाऱ्या मिळकतीतून कुटुंबाचा गाढा ओढणेदेखील कठीण होते. तरीदेखील आप्तस्वकीय व परिसरातील लोकांना आपल्या काही प्रमाणात असो घरी महाप्रसाद द्यायचे.

काहीही झाले तरी चालेल मात्र महालक्ष्मी पूजनात कुठलाही खंड पडत कामा नये. अशी भूमिका रामेश्वर व त्यांची पत्नी शोभाबाई यांची होती. हे दाम्पत्य सांगतात की, नवघरे कुटुंबात त्यांच्या घरी येण्या अगोदरपासूनच महालक्ष्मी पूजन केले जात होते. त्यांच्या सासुंनी पाच रुपयाला महालक्ष्मीचे मुखवटे खरेदी करून आणले होते. मात्र त्या काळी कुडाचे घर असल्यामुळे हे मुखवटे एका लोखंडी पेटीत ठेवले होते.

अविरत चालू असलेल्या परंपरेने त्यांच्या कुटुंबाची परिस्थितीत सुधारणा होऊन घरात सुख,समृद्धी,शांती लाभू लागली. अशाच प्रकारे जे कोणी मनोभावे महालक्ष्मी पूजन करतात त्यांच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो, असा या कुटुंबाचा विश्वास आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.