मित्रांसोबत नदीवर गेला फिरायला, पुलावरून पडून जीव गमावला

निर्गुडा नदीत बुडून अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : मित्रांसोबत नदीच्या पुलावर फिरण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा पुलावरून नदीत पडून मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी रात्री 8 वाजता दरम्यान वणी मुकुटबन मार्गावर निर्गुडा नदीच्या पुलावर घडली. सागर राजू ठावरी (17) असे मृत मुलाचा नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येथील गुरूनगर भागात राहणारा सागर ठावरी रात्री 8 वाजता सुमारास आपल्या दोन मित्रांसह निर्गुडाच्या पुलावर पोहचला. त्याच्या सोबत असलेल्या मित्रांच्या म्हणण्यानुसार सागरने पुलाच्या कठड्यावर बसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याचा तोल गेला आणि तो सरळ 50 फूट खाली पाण्यात कोसळला.

सागर पाण्यात कोसळतात त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. दरम्यान काही युवकांनी पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढून तातडीने सुगम हॉस्पिटलमध्ये आणले. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी पोहोचले. दवाखान्यात सागरच्या पोटातून पाणी काढण्याचे प्रयत्न करीत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. मृतक सागरचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

हे देखील वाचा –

मधमाशांच्या हल्ल्यात तरुण उपसरपंचाचा मृत्यू

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!