देशातील प्रख्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम आता वणीत

मार्कंडेय पोदार लर्न स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: सीबीएसई शिक्षणामध्ये सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थापैकी एक असलेली पोदार इंटरनॅशनल संस्थेचा उपक्रम आता आपल्या वणी शहरात सुरू झाला आहे. शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर घुग्गुस रोड वरील मंदर जवळ मार्कंडेय पोदार लर्न स्कूल सुरू करण्यात आली आहे. यासाठी 2022-23 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. या शाळेत नर्सरी ते वर्ग 6 वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. सदर शाळेत CBSE पॅटर्न चालवला जात असून अवघ्या काही जागा शिल्लक आहेत. त्यामुळे पालकांनी त्वरित आपल्या पाल्यााचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शाळा व्यवस्थापनाद्वारे करण्यात आले आहे.

शाळेची वैशिष्टे –
शाळेची निसर्गरम्य स्थळी प्रशस्त इमारत आहे. संपूर्ण वर्ग हे डिजिटल आहेत. शाळेत अनुभवी शिक्षकांची नियक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण, शुद्द पेयजल तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षक आहे. सोबतच विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उपलब्ध असून शिंदोला, नायगाव, चिखलगाव, वणी येथुन स्कूल बस सुविधा राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व इतर ऍक्टिव्हिटींना वाव मिळण्यासासाठी वर्षभर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व खेळ इत्यादींचे आयोजन केले जाणार आहे.

देशभरात नाव असलेल्या संस्थेत प्रवेश घेण्याची संधी
पोदार इंटरनॅशनल या शैक्षणिक संस्थेने देशभरात आपल्या शैक्षणिक पॅटर्नने एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्याचा वणी सारख्या शहरात उपक्रम सुरू होत आहे ही आपल्या परिसरासाठी आनंदाची बाब आहे. शाळेत प्रवेश सुरू झाले असून अवघ्या काही जागा शिल्लक आहेत. त्यामुळे आपल्या पाल्यांच्या ऍडमिशनसाठी एकदा शाळेला भेट द्यावी.
– शाळा व्यवस्थापन, मार्कंडेय पोदार लर्न स्कूल

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल
पत्ता: घुग्गुस रोड, मंदर
ऍडमिशनसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क: 9923991162, 9923991172

Comments are closed.