पाटाळा पुलावरील अपघातातील ताबिश नदीत की विदेशात ?

गेला ताबिश कुणीकडे ? शहरात उलट सुलट चर्चेला उधाण

0 58,495

वणी: गेल्या ४ दिवसांपूर्वी वणीतील शास्त्री नगर भागात राहणा-या ताबिश अफजलुद्दीन शेख या व्यावसायिक असलेल्या तरुणाची कार वर्धा नदीच्या पाटाळा येथील पुलावरून कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र अपघातातील ताबिश अद्याप कुणाला गवसलेला नाही. जर ताबिश दिसत नाही तर तो गेला कुठे हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान ताबिश नदीत की विदेशात ? अशी चर्चा वणीत रंगली आहे.

ताबिश हा बीसी चा व्यवसाय करीत होता. भीसीच्या रकमेची वसुली करण्यासाठी तो लगतच्या गाव खेड्यात जात होता. घटनेच्या दिवशी ताबिशची कार क्रमांक एम एच २९ ए आर ५४८२ ही पाटाळा येथील पुलावरून नदीपात्रात पडली असल्याची माहिती मिळाली. वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी तपासाला सुरुवात केली होती.ताबिश कुठे गेला? कोणाला भेटला ? कोणाशी संवाद साधला असे अनेक प्रश्न अनुत्तरित होते.

पोलिसांनी कार पडलेल्या जागेवर श्वान पथकाला पाचारण करून तपास सुरू केला होता. परंतु श्वानपथक घटनास्थळाचा बाहेर जातच नव्हते. कार पासून पाण्याकडे काही अंतरावरील दिशा दाखवत होते. परिसरात पावसाने चिखल असल्याने दुसरा मार्ग श्वान पथकाला सुद्धा गवसला नाही. ताबिश कार घेऊन एकटा गेला की त्याच्यासोबत आणखी लोक होते हा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे.

या घटनेतील अनेक बाबी संशयास्पद दिसत आहे. जर पाण्यात ताबिश असता तर वणी तालुक्यातच या प्रकरणाचा छळा लागला असता. परंतु अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नाही. भीसी व्यवसाय पैशाचा आहे. यातूनच काही नवीन योजना तर नसेल असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे आहेत. घरून गेलेला ताबिश कोणालाच कसा दिसला नाही किंवा त्याने कोणाला संपर्क केला असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. ताबिश नेहमी कोणाच्या संपर्कात होता. घटनेच्या दिवशी व त्याआधी कोणाशी संवाद साधला हा सुद्धा तपासाचा भाग आहे. जर अपघात असता तर जखमी अवस्थेत कुठेतरी थांगपत्ता लागला असता. मात्र अशी परिस्थिती कुठेच दिसत नाही.

(हे पण वाचा : शास्त्रीनगरातील ताबिशचा घात की अपघात ?)

उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, ठाणेदार मुकुंद कुळकर्णी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मात्र या तपासात ताबिश व त्याच्या संपर्कात असलेल्या लोकांचे मोबाईलच खरी दिशा ठरविणार असल्याचे दिसत आहे. मग ताबिश नदीत की विदेशात या बाबीचा छळा नक्कीच उलगडणार याबाबत पोलीस आशावादी आहेत. त्यानुसारच त्यांची तपासाची चक्रे फिरत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच या घटनेचा तपास करण्यासाठी वणी पोलीस कसून तपास करतांना दिसले आहेत. आता ताबिश चा घात की अपघात, की अपहरण की आणखी काही या बाबी प्रामुख्याने तपासणार असल्याचे दिसत आहे.

Comments
Loading...