पुरात खराब झालेली सोलर सिस्टम मोफत दुरुस्त करा
RN सोलर सिस्टिमद्वारा शेतक-यांसाठी मोफत सेवा, 2 एकर ते 50 एकर पर्यंत सोलर झटका मशिन उपलब्ध
बहुगुणी डेस्क, वणी: सध्या पुरामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतक-यांनी आपल्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी सोलर सिस्टम लावली आहे. मात्र पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतक-यांचे शेतात लावलेले झटका मशिन हे खराब झाले आहे. त्यामुळे शहरातील सुपरिचित वरोरा रोडवरील R & N एन्टरप्राईजद्वारा शेतक-यांसाठी मोफत सोलर सिस्टम दुरुस्ती करून देण्यात येणार आहे. याचा शेतक-यांनी लाभ घ्यावा तसेच एकद RN सोलर सिस्टम मध्ये एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन केले आहे.
RN इन्टरप्राईजेसमध्ये 45 एकरची झटका मशिन अवघ्या 8290 रुपयांमध्ये व 15 एकरची झटका मशिन अवघ्या 5990 रुपयांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोबतच मशिनवर 10 टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. हरबरा कटर मशिन अवघ्या 280 रुपये तर तुर शेंडा कटर मशिन अवघ्या 300 रुपयांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. ही ऑफर फक्त काही दिवसांसाठी राहणार आहे. त्यानंतर ग्राहकांना नेहमीच्या दरात झटका मशिन उपलब्ध होणार आहे.. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन वरोरा रोड वरील R & N एन्टरप्राईज तर्फे करण्यात आले आहे.
50 व 15 एकरसाठीच्या मशिनचे वैशिष्ट्ये
दोन्ही मशिन ही झटका मशिनमध्ये सुप्रसिद्ध असलेल्या Z + सुरक्षा या ब्रँडची आहे. 50 एकरच्या मशिनमध्ये 26 Ah 12 वोल्टची एक्साईडची बॅटरी बॅटरी आहे. 40 वॅटची एक्साईड प्लेट यात आहे. तर 15 एकरसाठीच्या मशिनमध्ये 12 Ah 12 व्होल्टची बॅटरी आहे. तर 20 वॅटची नोवा कंपनीची सोलर प्लेट आहे. दोन्ही बॅटरीसोबत अर्थिंग तार, अर्थिंग प्लेट, कनेक्शन वायर, 100 इन्सुलेटर, तसेच 500 मीटर वायर दिला जातो. विशेष म्हणजे ही मशिन थेट उत्पादकांकडून कडून ग्राहकांना दिली जाते त्यामुळे ग्राहकांना कमी दरात ही वस्तू खरेदी करता येत आहे.
आपला परिसर हा जंगलाच्या लगत असल्याने शेतकऱ्यांना रानडुकरे, नीलगाय, हरीण, सांबर यांचा कायमच अतिशय त्रास सहन करावा लागतो. वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे जवळपास 75 टक्के पिकांचे नुकसान होते. वन्यप्राण्याच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी वणीतील वरोरा रोडवरील R & N सोलर सिस्टिम ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्समध्ये Z+ सुरक्षा कंपनीची कुंपणासाठी सोलर झटका बॅटरी मशिन उपलब्ध आहे.
हरबरा कटर मशिन 280 रुपये तर तूर शेंडे कटर यंत्र 300 रुपयांमध्ये
दोन एकरसाठी उपयोगात पडणारी झटका मशिन अवघ्या दीड हजारापासून उपलब्ध करून दिली जात आहे. याशिवाय झटका मशिनच्या विविध रेंज ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे शेतक-यांसाठी एक्सचेंज ऑफरची सेवा देखील दिली जात आहे. या झटका मशिनच्या करंटमुळे पाळीव व वन्यप्राण्यांसह मनुष्याचीही जीवितहानी होत नाही. याशिवाय हरबरा कटर मशिन अवघ्या 280 रुपये तर तूर शेंडा कटर मशिन अवघ्या 300 रुपयांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
घाम गाळून पिकवलेले पीक केवळ वन्यप्राण्यांमुळे उद्ध्वस्त होते. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागते. यापासून बचाव करण्याासाठी अनेक शेतकरी विष प्रयोग, दारुगोळ्याचा प्रयोग किंवा कुंपणाला इलेक्ट्रिक करंट देखील लावला जातो. मात्र यामुळे अनेकदा जंगली जनावरासह पाळीव प्राण्यांचा तसेच प्रसंगी याचा करंट लागून मनुष्याचा देखील मृत्यू होतो. R & N सोलर सिस्टिम ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्स या प्रतिष्ठानमध्ये सोलरवर चालणारी झटका मशिन उपलब्ध आहे. ही मशिन लावल्यास पिकांचे तर रक्षण होतेच शिवाय कुठलीही जीवित हानी होणार नाही.
शेताच्या कुंपणाला लावलेल्या या सिस्टिमद्वारा डी.सी. हाय होल्टेजचा झटका प्रतिसेकंदाला दिला बसतो. या धक्यामुळे वन्यप्राण्यांमध्ये भीती निर्माण होते व ते दुसऱ्यांदा असे कुंपण लावलेल्या शेताकडे फिरकत नाही. अनावधाने मनुष्याचा जरी या तारेच्या कुंपणाला स्पर्श झाला तरी त्याला केवळ हलका झटका बसतो व जिवीतहानी होत नाही.
Z+ सुरक्षा झटका मशिनचे वैशिष्ट्ये
सदर कंपनी ही ISO मानांकन प्राप्त कंपनी आहे. या झटका मशिनचा कोणताही मेन्टन्स करावा लागत नाही. ही मशिन एका सेकंदाला सुरू होते तर दुस-या सेकंदाला बंद होते त्यामुळे कोणतीही जीवितहानी होत नाही. विशेष टेक्नॉलॉजीद्वारा इलेक्ट्रीक दाबावर नियंत्रण ठेवले जाते. मशिनची बॅटरी चार्जिंग करण्याची गरज नाही सौर उर्जेवरच ही बॅटरी चार्ज होते. उन्ह नसताना किंवा पावसाळ्यातही ही मशिन योग्य पद्धतीने काम करते. काही समस्या आल्या अवघ्या दोन दिवसात मशिन दुरुस्त करून दिली जाते.
सदर मशिन ही रात्री बंद होते तर सकाळी सुरू होते. एक आठवडा जरी सूर्यप्रकाश नसला तरी मशिन काम करीत राहते व पिकांचे संरक्षण होते. तार तुटल्यास किंवा पिकांच्या फांदीचा स्पर्श झाल्यास अलार्म सुरू होतो. बॅटरी डिसचार्ज होत नाही. कोरड्या जमिनीवरही ही सिस्टिम काम करते. याशिवाय अर्थिंगसाठी तार शेतात फिरविण्याची गरज नाही. विशेष म्हणजे पावसाळ्यात ताराला हिरवळ लागल्यास बॅटरी डिसचार्ज होण्याची समस्या असते मात्र या मशिनमध्ये ही समस्या येत नाही.
डेमोसाठी संपर्क साधू शकता: संचालक
सदर मशिनचा आम्ही डेमो उपलब्ध करून दिला आहे. केवळ एका कॉलवर तुम्हाला या मशिनचा डेमो दिला जाईल. आम्ही अधिकृत डिलर असल्याने ग्राहकांना अत्यल्प दरात मशिन मिळते. याशिवाय ठोक तसेच चिल्लर विक्रीही केली जाते. ज्या शेतक-यांना मशिनन एक्सचेंज करायची आहे त्यांना एक्सचेंज देखील करता येणार आहे. अधिक माहितीसाठी एकदा आमच्या वरोरा रोडवरील नगर परिषदेच्या कॉम्प्लेमधील प्रतिष्ठानाला भेट द्यावी
– संचालक, आर ऍन्ड एन सोलर सिस्टिम ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्स
पत्ता: नगर परिषद कॉम्प्लेक्स, ब्लॉक नं. 34, वरोरा रोड, ओरिजिन कॉम्प्युटरच्या बाजुला, वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: राजू किन्हेकर – 8999124806, निकेश निब्रड – 8999952507
Comments are closed.