Browsing Category

वणीवार्ता

Local News

जिल्हाधिका-यांचा आदेश धडकला, अन् अनेक उमेदवारांचा हिरमोड

भास्कर राऊत, मारेगाव: नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. आणि नामांकन दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या घटकाला न्यायलयाने दिलेल्या निर्णयाचा आदेश तहसिल कार्यालयात येऊन धडकला आणि अनेकांच्या…

वणीत एसटीच्या सोमवारी 3 तर मंगळवारी 7 फे-या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: संपा दरम्यान फेरीसाठी निघालेल्या एका बसवर दगडफेक झाल्याने लालपरीची चाके पुन्हा थांबली होती. मात्र तब्बल एक आठवड्यानंतर पुन्हा लालपरीची चाके धावायला सुरूवात झाली आहे. सोमवारी वणी डेपोतून 3 बसेस तर मंगळवारी 7 बसेस…

सुकनेगाव शिवारात वाघाचा बैलावर हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: सुकनेगाव शिवारात आज दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान एका वाघाने एका बैलावर झडप घातली. यात बैल जखमी झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुकनेगाव शिवारात वाघाचा मुक्त संचार असून वाघाचा शेतातील जनावरांवर हल्ला ही नित्याचीच बाब…

घोन्सा फाटा येथे रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

रमेश तांबे, वणी: तालुक्यातील घोन्सा फाटा येथे आज अवैध रित्या रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला. सदर ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती आढळून आली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रेती, ट्रॅक्टर व…

शहरातील अर्ध्या रस्त्यांवर ‘ऑटो’ व ‘ट्रॅव्हल्स’चा ताबा

जितेंद्र कोठारी, वणी: एसटी कामगारांच्या संपामुळे सध्या खासगी प्रवासी वाहतुकदारांचे चांगलेच फावत आहे. मात्र ऑटो व ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी आता इतर वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. शहरातील अर्ध्या अधिक प्रमुख रस्त्यांवर ऑटोचालकांनी कब्जा…

वणीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठिकठिकाणी अभिवादन

जितेंद्र कोठारी, वणी: महापरिनिर्वाण दिनानिमित्त वणीत ठिकाठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचशील नगर, भीमनगर, सम्राट अशोक नगर, दामले ले आऊट, रंगनाथ नगर विठ्ठलवाडी, शाळा क्रमांक 7 इत्यादी…

शेतकऱ्यांनो सावधान ..! चोरट्यांची नजर आता पांढऱ्या सोन्यावर

जितेंद्र कोठारी, वणी: आपल्या शेतात दिवसरात्र घाम गाळून पिकविलेले शेतमालही आता सुरक्षित राहिले नाही. शेतातील पाण्याची मोटर, केबल, स्टार्टर व शेतीपयोगी अवजारांची चोरीनंतर चोरट्यांची नजर आता शेतमालाकडे लागली आहे. वणी तालुक्यातील अनेक गावात…

मारेगाव नगर पंचायत निवडणूक: नेत्याचा नेम करेल कोणाचा गेम?

भास्कर राऊत, मारेगाव: नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जसा जाहीर झाला तसा हौसे, गौसे, नवसे यांचा वार्डामध्ये प्रचार आणि फिरणे सुरू झाले आहे. तर दुसरीकडे तिकीट आपल्यालाच मिळाले पाहिजे यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहे. यासाठी…

रंगारीपुरा येथे एका घरी लागली भीषण आग

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील टागोर चौक जवळ एका घरी आज सकाळी 9.15 वाजताच्या सुमारा भीषण आग लागली. या आगीत घरातील वस्तू जळाल्या. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. आगीत सुमारे 35 ते 40 हजारांचे…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेपेरा येथे रक्तदान शिबिर

विवेक तोटेवार, वणी: 6 डिसेंबर सोमवार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी तालुक्यातील नांदेपेरा येथील जेतवन बुद्ध विहार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबीर हे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत…
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!