ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

गडचांदूर- नांदाफाटा जवळ अपघात

0

विलास ताजने, वणी: चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील पावर हाऊस जवळील वळणावर दुचाकी आणि ट्रक यांच्यात  दि.२ बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात घटनास्थळी दुचाकी चालकाचा मृत्यू झाला.  नांदा येथील अंगद मोतीराम साहू वय २४ असे मृतकाचे नाव आहे.

अंगद हा दुचाकी क्रमांक एम एच ३४ व्ही १२७९ ने गडचांदूर येथे कामानिमित्त जात होता.  त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणारा ट्रक आणि दुचाकीत झालेल्या अपघातात चालकासह दुचाकी ट्रकच्या चाकात आली. परिणामी चाके अंगावर गेल्याने साहू याचा मृत्यू झाला.

गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी घटनेचा पंचनामा केला. गडचांदूर येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अपघातस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गडचांदूर पोलीस पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.