वणीत पतंजली मेगा स्टोअर्स सुरू
राम शेवाळकर परिसरात शुभारंभ, 400 पेक्षा अधिक हर्बल प्रॉडक्ट उपलब्ध
वणी: वणीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वणीत साई पतंजली मेगा स्टोअर्स सुरु झालं आहे. 9 ऑक्टोबरला याचा शुभारंभ झाला. वणीतील यवतमाळ रोडवरील राम शेवाळकर परिसरामध्ये मध्ये हे पतंजलीच्या हर्बल प्रॉडक्टचं स्टोर्स सुरु करण्यात आलं आहे. एका आदिवासी चिमुकलीच्या हस्ते या स्टोरचं उद्घाटन करण्यात आलं. आता पतंजलीचे 400 पेक्षा अधिक प्रॉडक्ट तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे. हे स्टोअर्स सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहणार असून ग्राहकांना या वेळेत जाऊन पतंजलीचे आयुर्वेदिक प्रॉडक्ट खरेदी करता येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वणीमध्ये पतंजलीच्या हर्बल प्रॉडक्टची मागणी वाढली होती. मात्र हे सर्व प्रॉडक्ट वणीत उपलब्ध नव्हते. त्यामुळे वणीकरांची मागणी लक्षात घेऊन अखेर वणीत पतंजलीच्या संपूर्ण हर्बल प्रॉडक्टचं स्टोअर्स “साई पतंजली मेगा स्टोर्स” हे सुरू करण्यात आलं आहे. या मेगा स्टोर्समध्ये पतंजलीचे 400 पेक्षा अधिक हर्बल प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. या सर्व प्रॉडक्टची किंमत कमी असून हे सर्व आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत.
काय आहेत प्रॉडक्ट ?
घरातील किचनला लागणा-या साहित्यापासून ते ब्रेकफास्ट, कॉस्मेटिक्स, होम केअर, हेल्थ सप्लिमेंट, पर्सनल केअर यासाठी लागणारे सर्व प्रॉडक्ट इथे उपलब्ध आहेत.
किचन मध्ये लागणारे पीठ, बेसन, डाळ, तांदुळ, तूप, तेल, हिंग, मसाले इत्यादी प्रॉडक्ट उपलब्ध आहेत तर ब्रेकफास्टला लागणारे बिस्किट, कॉर्नफ्लेक्स, आटा नुडल्स, डलिया, ओट्स इत्यादी प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. तसंच सौंदर्य प्रसाधनासाठी लागणारे फेसवॉश, फेसपॅक, ब्युटी क्रिम, ऍन्टी पिंपल्स क्रिम, स्क्रब इत्यादी उपलब्ध आहेत. तर हर्बल सप्लिमेंट म्हणून हर्बल पॉवर विटा, च्यवनप्राश, बादाम पाक, चटणी, लोणचे, जॅम इत्यादी सोबतच साबन आणि शॅम्पू देखील उपलब्ध आहेत.
सध्या घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त होम केअर साहित्याचा वापर होतो. मात्र आता वणीत हर्बल फ्लोअर क्लिनर, टुथपेस्ट, डिशवॉश, साबन इत्यादी उपलब्ध झाले आहेत. सोबतच हेल्थ सप्लिमेंट म्हणून ज्युस, एलोवेरा, आवळा, व्हिटग्रास, यौवन चूर्ण, शिलाजीत, अश्वगंधी, अश्वशिला कॅप्सुल इत्यादी प्रॉडक्टही साई पतंजली मेगा स्टोर्स मध्ये उपलब्ध आहेत.
शहरातील नव्यानच झालेल्या राम शेवाळकर परिसरात साई पतंजली मेगा स्टोर्स सुरू झाले असून सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत ग्राहकांना मेगा स्टोर्सला भेट देता येईल. याशिवाय ज्या ग्राहकांना प्रॉडक्टबाबत अधिक माहिती हवी आहे. त्यांना 7887672488 या मोबाईल नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कॉल करून तुम्हाला हवी असलेली माहिती दिली जाणार आहे. वणीत पहिल्यांदास संपूर्ण आयुर्वेदिक प्रॉडक्टचं स्टोर्स सुरू झालं असल्यानं या स्टोर्सला एकदा ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी असं आवाहन साई मेगा स्टोर्सच्या संचालकांनी केलं आहे.
पत्ता:
साई पतंजली मेगा स्टोअर्स
राम शेवाळकर परिसर, वणी
मोबाईल नंबर – 7887672488