Monthly Archives

September 2024

750 पेक्षा अधिक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालु्क्यात शेकडो शेतक-यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केले आहे. शासनाने त्यांचा पंचनामा केला. मात्र अद्यापही साडे सातशे पेक्षा अधिक शेतक-यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. अखेर त्रस्त झालेल्या शेतक-यांनी…

घरात दरोडेखोरांची टोळी, बाहेर लाठी काठी घेऊन वार्डातील युवक…

विवेक तोटेवार, वणी: घरात हाती रॉड घेतलेले 6 दरोडेखोर होते. तर बाहेर वार्डातील काही लोक हाती लाठी काठी घेऊन आले. प्रगतीनगरमध्ये राहत असलेल्या डोर्लीकर यांच्या घरी मध्यरात्री हा थरार घडला. त्यांच्या मुलीने समयसूचकता दाखवत मोबाईलवरून याची…

प्रगतीनगरमध्ये दरोड्याचा प्रयत्न, प्रसंगावधनामुळे दरोडेखोर पसार

विवेक तोटेवार, वणी: प्रगती नगर येथील डोर्लीकर यांच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. डोर्लीकर यांच्या मुलीच्या प्रसंगावधनामुळे दरोडेखोरांचा प्लान फसला. मात्र दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झालेत. बुधवारच्या मध्यरात्री ही घटना…

पुराचा कहर… नाल्याच्या पुरात पिकअप गेले वाहून

वणी: तालुक्यातील शेवाळा गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याच्या पुरात पीक अप वाहन वाहून गेले. ही घटना दि. 4 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. सुदैवाने या घटनेत वाहन चालक सुखरूप पुरातून बाहेर पडला. वणी तालुक्यातील मेंढोली, शिरपूर,…

कॉलेजमधल्या मुलांनीच काढली क्लासमेट मुलीची छेड

विवेक तोटेवार, वणी: घरी जात असलेल्या एका कॉलेज कुमारिकेची तिघांनी छेड काढली. या प्रकरणी तिघांविरोधात वणी पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असून ते पीडितेच्या कॉलेजमध्येच शिकतात.…

करला रंगला जुगार…13 जुगा-यांना अटक, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

बहुगुणी डेस्क, वणी: कर निमित्त परिसरातील अनेक गावांमध्ये जुगार रंगतो. दिनांक 3 सप्टेंबर रोजी पोलिसांनी 3 विविध ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी 13 जुगा-यांना अटक केली. तर काही पळून जाण्यात यशस्वी झालेत. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1 लाखांचा…

शेतीच्या वादातून तिघांना लाकडी उभारीने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: शेतीच्या वादातून दोन कुटुंबीयांमध्ये वाद झाला. या वादातून लाकडी उभारीने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एक जखमी झाला आहे. तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. वागदरा येथे तान्हा पोळ्याच्या दिवशी सकाळी 10 वाजताच्या सुमारास…

तान्हा पोळ्याच्या दिवशीच अल्पभूधारक शेतक-याची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पठारपूर येथील एका अल्पभूधारक शेतक-याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. तान्हा पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुनील भाऊराव उलमाले ( वय अंदाजे 38) असे मृताचे नाव आहे.…

मेंढोली व लाठी चौफुली येथे अवैध दारू विक्रेत्यावर धाड

बहुगुणी डेस्क, वणी: पोळ्याच्या दिवशी सुरु असलेल्या मेंढोली व लाठी चौफुली येथे शिरपूर पोलिसांनी कारवाई केली. लाठी येथे सकाळी तर मेंढोली येथे संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी तीन आरोपींवर…

साडे 10 फुटी अजगर रेस्क्यू, वांजरी येथील घटना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वांजरी या गावात एक साडे 10 फुटी अजगराला रेस्क्यू करण्यात आले. वनविभाग व स्थानिक वन्य प्रेमींच्या समयसुचकतेमुळे सापाला जीवदान मिळाले. दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडली. वणी तालुक्यातील वांजरी या गावामध्ये…