खा. धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
150 रक्तदात्यांचे रक्तदान, काँग्रेस कमेटीचा उपक्रम
जब्बार चीनी, वणी: वणी-चंद्रपुर लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्त कोविड 19 च्या संकटामुळे सध्या रक्तपेढीतील साठा खालावलेला आहे. हा रक्तपुरवठा भरून काढण्यासाठी शहर व तालुका काँग्रेस कमेटी तर्फे शनिवार 4 जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
वसंत जिनींग सभागृहात आयोजित या शिबिराचे उदघाटन माजी आमदार वामनराव कासावार यांनी केले. या शिबिरात परिसरातील 154 युवकांनी रक्तदान केले आहे. शिबिरासाठी चंद्रपूर येथील सरकारी रक्त पेढीची चमू रक्त गोळा करण्यासाठी आली होती.
या रक्तदान शिबिरासाठी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, तालुका अध्यक्ष विवेक मांडवकर, माजी जि.प. सदस्य आशिष खुलसंगे, ओम ठाकुर, भास्कर गोरे सहीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.