जब्बार चीनी, वणी: चार पाच दिवस दिलासा दिल्यानंतर आज पुन्हा तालक्यात कोरोनाची संख्या अचानक वाढली. आज तालुक्यात 121 पॉझिटिव्ह आढळलेत. मात्र ही रुग्णसंख्या आज तब्बल RTPCR व ऍन्टिजनचे तब्बल 829 रिपोर्ट प्राप्त झाल्याने वाढली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 15 तर ग्रामीण भागात 99 रुग्ण आढळलेत. यात भालर येथे सर्वाधिक 27, उकणी येथे 21 तर चिलई येथे 14 रुग्ण आढळले आहेत. तर 7 रुग्ण इतर भागातील आहे. आजची रुग्णसंख्येमध्ये ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. सध्या खबरदारी म्हणून गावागावात कोरोना चाचणी कॅम्प घेतले जात आहे. त्यामुळे ज्या गावात असे कॅम्प आयोजित होत आहे अशा गावात रुग्णसंख्या आढळून येत आहे. मात्र या खबरदारीमुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होत आहे.
वणी शहरात गेल्या चार दिवसात 16, 4, 1 व 15 रुग्ण आढळलेत. हा आकडा देखील कमी होत आहे. आज 829 अहवाल आलेत यात 121 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत म्हणेज रुग्णसंख्येचा दर हा अवघ्या 15 टक्यावर आला आहे. हा दर आधी 25 ते 30 टक्यांपर्यंत गेला होता. याशिवाय कोरोनामुक्त होणा-यांचा दर ही झपाट्याने वाढत आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणारा मृत्यूदर ही अचानक कमी झाला आहे. गावोगावी घेतले जाणारे कोरोना चाचणी शिबिर, ऑन स्पॉट कोरोना टेस्ट तसेच लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रसार कमी होण्यास मदत होत आहे.
वणी शहरात आलेल्या 15 रुग्णांमध्ये रंगारीपुरा येथे सर्वाधिक 4 रुग्ण, देशमुखवाडी 3, विठ्ठलवाडी, प्रगती नगर येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर झेडपी कॉलनी, विनायक नगर, गांडलीपुरा, इंदिरा चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
ग्रामीण भागात आलेल्या 99 रुग्णांमध्ये भालर येथे सर्वाधिक 27, उकणी येथे 21 तर चिलई येथे 14 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय तेजापूर येथे 8, नवरगाव 6, राजूर 5, चिखलगाव, गणेशपूर, मेंढोली, बेसा, निंबाळा रोड येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर सावर्ला, परसोनी, मंदर, पिंपळगाव, केसुर्ली, कृष्णानपूर, परसोडा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर वरोरा येथील 3, झरी येथील 2 व मारेगाव व पांढरकवडा तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्ण वणीत पॉझिटिव्ह आला आहे.
आज यवतमाळ येथून 626 अहवाल प्राप्त झालेत. यात 110 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 203 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 11 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 203 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 1792 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात कोरोनाचे 594 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 72 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 444 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 77 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 4877 रुग्ण आढळून आलेत. यातील 4205 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 79 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.
हे देखील वाचा: