जितेंद्र कोठारी, वणी: भाऊबीज निमित्त घरातील सर्वजण बाहेर गावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केली. तालुक्यातील वांजरी गावात शुक्रवार मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेत चोरटांनी 32 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार वांजरी येथील शेतकरी सुरेश रामचंद्र ढेंगळे यांनी सोयाबीनच्या चुकाऱ्यापैकी मिळालेले 20 हजार रुपये व सोन्याचे जुने मंगळसूत्र लोखंडी कपाटात ठेवले होते. भाऊबीज निमित्त ते व कुटुंबीय शुक्रवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी भद्रावती तालुक्यातील वाघेडा गावाला गेले. मात्र घरी कुणी नाही ही संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री त्यांचे घर फोडले.
आज शनिवारी दिनांक 13 ऑक्टो. रोजी घराशेजारी राहा-यांना त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले आढळले. सुरेश यांचा भाऊ सुधाकर ढेंगळे यांनी तातडीने फोन करून याबाबत माहिती दिली.
सुरेश ढेंगळे तात्काळ गावात पोहचले. त्यांनी घराची पाहणी केली असता घरातील सर्व सामान व अस्तव्यस्त पडून दिसले. तसेच लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यामध्ये ठेवलेले रोख 20 हजार रुपये व जुने वापरत असलेले 3 ग्राम सोन्याचे मंगळसुत्र किंमत 12 हजार असे एकूण 32 हजाराचे माल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे दिसून आले.
फिर्यादी सुरेश रामचंद्र ढेंगळे (50) यांनी लगेच वणी पोलीस स्टेशन गाठून चोरीची तक्रार नोंदविली. वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्द कलम 457, 380 अनव्ये गुन्हा दाखल केले आहे. पुढील तपास एएसआय प्रभाकर कांबळे करीत आहे.
हेदेखील वाचा:
Comments are closed.