पुरुषोत्तम नवघरे, वणी: पोलिओच्या उच्चाटनासाठी तालुक्यात रविवारी दिनांक 3 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या नियोजनासाठी तहसीलदार निखिल धुळधर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय दक्षता समितीची सभा घेण्यात आली. सभेला गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद, गटशिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचा सहभाग होता.
प्राथमिक आरोग्य केन्द्र, आरोग्य उपकेन्द्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी केन्द्रे, नगरपरिषदेच्या शाळा, बालवाडी ई. ठीकाणी आणि प्रवासात असणाऱ्या बालकांसाठी बस स्टँड, रेल्वे स्टेशन, टोल नाके येथे पोलिओचे डोस देण्याची व्यवस्था केलेली आहे. 0 ते 5 वर्षांपर्यंतच्या वणी शहरातील सुमारे 7 हजार 818 व ग्रामीण भागातील 10 हजार 634 बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. विशेष दक्षता म्हणून तालुक्यात विविध ठिकाणी वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय कामगारांच्या व स्थलांतरित समुदायाच्या बालकांना पोलिओ लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या 0 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओ लस द्यावी असे आवाहन केले आहे.
Comments are closed.