ती झोपून होती आईच्या कुशीत, मात्र विषारी सापाने केला दंश

14 महिन्याच्या चिमुकलीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: एका चौदा महिन्याच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. सोमवारी दिनांक 29 एप्रिल रोजी मध्यरात्री ही घटना घडली. काव्या वैभव खेवले असे मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावर एंटीडोट्स उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. एका चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पल्लवी व वैभव खेवले हे टाकळी ता. मारेगाव येथील रहिवासी आहे. त्यांना काव्या नावाची 14 वर्षांची मुलगी होती. सोमवारी रात्री काव्या आईसोबत झोपली होती. दरम्यान मध्यरात्री एक मन्यार जातीचा विषारी साप खोलीत आला. सापाने काव्याच्या पायाला चावा घेतला. दंश केल्याने काव्या रडायला लागली. मुलीच्या रडण्यामुळे काव्याची आई उठली. दरम्यान तिला शेजारी एक साप दिसला.

मुलीला साप चावल्याचे लक्षात येताच पती पत्नींनी शेजा-यांना उठवले. काहींनी तात्काळ साप पकडला. काव्याला तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सर्पदंशावर प्रभावी उपचार नसल्याने काव्याला प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र वाटेत तिचा मृत्यू झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.