मसेसं, ब्रिगेड तर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

सहका-यांशी स्पर्धा नको - विधिज्ज्ञ ऍड दिपक चटप

बहुगुणी डेस्क, वणी: कोणताही अभ्यास करताना स्पर्धा ही तुमच्या सहकाऱ्यांशी न करता जागतिक क्षेत्राशी असावी. त्यामुळे तुमच्यातील क्षमतांना अमर्याद पंख फुटतील. म्हणून स्पर्धा स्वत:शीच करावी, त्या द्वारे आपल्यामधील उणिवांवर मात करावी. म्हणजे यशाचे शिखर पादाक्रांत होईल. असे मार्गदर्शन जागतिक पातळीवरील स्कॉलर व ब्रिटिश सरकारचा चेव्हनिंग ग्लोबल लिडर पुरस्कार सन्मानित विधिज्ज्ञ ऍड दिपक चटप यांनी केले. ते “देश विदेशातील शिष्यवृत्तीच्या संधी” या विषयावर कुणबी समाज सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रमाता जिजाऊ स्मृतीदिन आणि राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. दि. 23 जून रोजी दुपारी हा कार्यक्रम पार पडला. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड वणी-मारेगाव-झरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील गुणवंतांच्या सत्कार देखील करण्यात आला.

जिजाऊ, शाहु महाराज यांच्या अभिवादनाने आणि सामुहिक जिजाऊ वंदनेने सोहळ्यास प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर होते. तर सावित्रीआई फुले वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण राजुरकर, मसेसं जिल्हा कार्याध्यक्ष अनंत मांडवकर, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय धोबे,शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी, मसेसं मारेगांव अध्यक्ष ज्योतिबा पोटे, जिजाऊ ब्रिगेड वणी अध्यक्ष भारती राजपुत, मारेगांव अध्यक्ष लिना पोटे,कपील शृंगारे,प्रविण खंडाळकर इत्यादींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमात रूपाली मोहितकर यांचा डीवायएसपी म्हणून निवड झाल्याबद्दल, शुभम वागदरकर यांचा परदेशातील उल्लेखनिय यशाबद्दल तसेच वीर भगतसिंग विद्यार्थी मंडळातील शासकीय सेवेत निवड झालेल्या अन्य विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. सोबतच तिन्ही तालुक्यातील दहावी, बारावी आणि अन्य प्राविण्यप्राप्त यशवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

प्रासंगिक मनोगत प्रा. बाळकृष्ण राजुरकर, अनंत मांडवकर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक अजय धोबे, सूत्रसंचालन मारोती जिवतोडे व दत्ता डोहे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ज्योतिबा पोटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता भाऊसाहेब आसुटकर, सुरेन्द्र घागे, वसंत थेटे, संजय गोडे, संदीप गोहोकर, आशिष रिंगोले, केतन ठाकरे, गणेश बोंडे, लहु जिवतोडे, आशिष झाडे आदींनी परिश्रम घेतले.

Comments are closed.