बहुगुणी डेस्क, वणी: गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भक्तीगीतांवर आधारित एकलनृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 28 जुलै रोजी दुपारी 12 वाजता स्थानिक छोरिया लेआउट मधील श्री विनायक मंगल कार्यालयात होईल. नाव नोंदणीकरिता 25 जुलै ही अंतिम तारीख आहे. या तारखेपर्यंत प्रवेश फी 100 रूपये आहे. स्पर्धेच्या दिवशी प्रवेश फी 300 रुपये राहील. विजय चोरडिया या़च्या पुढाकाराने, स्वर्गीय पारसमलजी चोरडिया फाउंडेशनच्या मदतीने संस्कार भारती समिती आणि सागरझेप बहुउद्देशीय संस्थेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा दोन गटांत होईल. अ गटात 6 ते 14 वर्षे वयोगटातील स्पर्धक असतील. ब गटात 14 वर्षावरील स्पर्धक असतील. विजेत्यांना प्रथम पारितोषिक 3,000 रुपये रोख, द्वितीय पारितोषिक 2000 रुपये तर तृतीय पारितोषिक 1000 रुपये रोख राहील. या स्पर्धेसाठी काही नियम आणि अटी आहेत. गाणं हे तीन मिनिटांच्या आत असावं. स्पर्धकांनी स्वतःची स्वाक्षरी केलेला फॉर्म भरणे आवश्यक आहे. नृत्य सादर करताना त्यात भक्तीरस असला पाहिजे. स्पर्धकांनी गाणं स्वतः पेन ड्राईव्ह किंवा मोबाईलमध्ये आणावं. आयोजकांचा आणि परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. त्यांनी वेळेवर केलेला बदल स्पर्धकांना मान्य करावा लागेल.
अधिक माहितीकरिता 9028903511, 9881110783, 7758896772, 9764716124 या नंबरवरती संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.
Comments are closed.