क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळेत हर घर तिरंगा मोहीम

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: मंगळवारी दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळा क्रमांक 8 मध्ये हर घर तिरंगा मोहीम साजरी झाली. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम झालेत. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून वणी नगर परिषदचे उपमुख्यअधिकारी जयंत सोनटक्के, परीक्षक म्हणून शाळेच्या माजी ज्येष्ठ शिक्षिका धुर्वे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन गुरनुले व कार्यक्रमाचे आयोजक शाळेचे मुख्याध्यापक किशोर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात प्रथम वेशभूषा स्पर्धा झाली. त्यानंतर नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जबरदस्त सादरीकरण केले. यामध्ये सामूहिक नृत्य व एकल नृत्य यांचे प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे सादरीकरण केले. कार्यक्रमाला पालकांचा बहुसंख्य प्रमाणात सहभाग लाभला. विद्यार्थ्यांनी सुद्धा कार्यक्रमास उत्तम प्रकारे प्रतिसाद देऊन आनंद घेतला.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षक देवेंद्र खरवडे यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षक अविनाश तुमडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका जकाते, शिक्षिका राऊत, शिक्षिक जगताप तसेच शाळेच्या मदतनीस निशा कावडे यांनी मोलाचे योगदान दिले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.