बहुगुणी डेस्क, वणी: आदर्श बहुउद्देशीय संस्था वणी द्वारा संचालित आदर्श प्रशासकीय महाविद्यालय वणी येथे संस्कृत सप्ताह पार पडला. संस्कृत भारती शाखा वणी द्वारा येथे 19 ऑगस्ट 2024 ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधीत हा सप्ताह साजरा करण्यात आला. या सात दिवसात विविध संस्कृत ज्ञानवर्धक कार्यक्रम घेण्यात आले. संस्कृत श्लोक पाठांत स्पर्धा, संस्कृत सुलेख स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, संस्कृत गीत स्पर्धा, संस्कृत निबंध स्पर्धा, पर्यावरण संदेश संस्कृतीने, संस्कृत संदेश रंगोळी स्पर्धा इत्यादी स्पर्धा राबवण्यात आले. समारोपीय दिवशी वृक्षारोपण करून समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गौरकार, उपाध्यक्ष उज्वला गौरकार, सचिव पुरुषोत्तम नवघरे, प्राचार्य निशांत खोब्रागडे, संस्कृत भारती वणी नगर मंत्री प्रा. महेश पुंड, प्रा. प्रिया सावरकर, प्रा.किसन किनाके, प्रा.प्रतिक चांदुरकर, रंजना भंडारवार, प्रणाली पत्रीवार, सूरज भोयर, रुपेश आलम, शुभम गानफाडे, प्राची मोहितकर, दीपक मोहुर्ले यांच्यासह विद्यार्थिनी आचल कोवे, कीर्ती दासरवार, अश्विनी राजुरकर, राधिका मडावी, अश्विनी कुडमेथे, प्राची परचाके, काजल ढेंगळे, हिना उपरे, रूपाली ठाकरे, गौरी कामटकर, सानिया पठाण, श्रुतिका गंधेवार, प्रतीक्षा गिरडकर, श्रेया गोरे, निशा कार्लेकर, श्वेता अस्वले, विशाखा पेंदोरे, पुनम पत्रकार, आरती मेश्राम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता परिश्रम घेतले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post
Comments are closed.