वणीत विदर्भवाद्यांतर्फे आंदोलन, नागपूर कराराची होळी

विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने शनिवारी नागपूर कराराची होळी करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. शहरातील छ. शिवाजी महाराज चौकात दुपारी हे आंदोलन झाले. राज्य निर्मितीसाठी आवश्यक असणा-या सर्व सुविधा विदर्भात असताना अद्यापही स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आली नाही. याचा निषेध म्हणून विदर्भवादी नेते पुरुषोत्तम पाटील यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. 

28 सप्टेंबर 1953 रोजी नागपूर करार झाला. या नागपूर कराराप्रमाणे विदर्भाला बळजबरीने विदर्भाच्या जनतेची इच्छा नसताना महाराष्ट्रात सामील करून घेतले. नागपूर करारात दिलेल्या 11 कलमांपैकी बहुतांश कलमा पाळल्या गेल्या नाही म्हणून नागपूर करार हा संपुष्टात आला असून विदर्भातील जनतेचा बॅकलॉग वाढला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून आतापर्यंत 50 हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली.

बेरोजगारांची फौज वाढली, नक्सलवाद वाढला, कुपोषण वाढले आहे यापासून मुक्ती करता स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केंद्र सरकारने तात्काळ करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन कर्त्यांनी नागपूर कराराच्या प्रतीची होळी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी देवराव धांडे, होमदेव कनाके, देवा बोबडे, बालाजी काकडे, रफिक रंगरेज, बाळकृष्ण राजुरकर, नामदेव जानेकर, प्रभाकर उईके, काशिनाथ देऊळकर, पुंडलिक पताडे, राजू पिंपळकर, धीरज भोयर, संजय चिंचोलकर, राहुल खारकर, श्रीवल्लभ सरमोकदम आदी विदर्भवादी नेते उपस्थित होते.

Comments are closed.