दिवाळीचा खुसखुशीत, घरगुती चवीचा फराळ आताच ऑर्डर करा

लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या फॅक्टरी आउटलेटमध्ये ठोक व चिल्लर विक्रीसाठी ऑर्डर सुरू

वणी: दिवाळी जवळ येत आहे. त्यामुळे अनेकांनी दिवाळीच्या फराळाची तयारी सुरु केली आहे. मात्र कामाच्या व्यापात व धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना घरी फराळ करणे शक्य होत नाही. मात्र ही समस्या आता लक्ष्मी इंडस्ट्रीजने सोडवली आहे. नायरा पेट्रोल पंप, गणेशपूर-वणी रोडवर लक्ष्मी इंडस्ट्रीजचे फॅक्टरी आउटलेट आहे. इथे दिवाळी संपूर्ण फराळ जसे चिवडा, चकली, शेव, शंकरपाळे, लाडू, बालुशाही यासह मिक्चरव इतर नमकिन मिळतो. विशेष म्हणजे हा सर्व माल फॅक्टरीतून काढलेला फ्रेश माल आहे. अगदी वाजवी दरात ग्राहकांसाठी हा माल उपलब्ध आहे.

गेल्या तीन वर्षांपासून हजारो ग्राहकांचा विश्वास प्राप्त केल्यानंतर या वर्षी देखील दिवाळीच्या फराळाची ऑर्डर सुरु करण्यात आली आहे. ग्राहकांना फक्त एका कॉलवर किंवा फॅक्टरी आऊटलेटला भेट देऊन फराळ बूक करता येणार आहे. बुकिंगसाठी व अधिक माहिती साठी लक्ष्मी इंडस्ट्रीज फॅक्टरी आउटलेट मुकुटबन रोड, नायरा पेट्रोल पंप जवळ, गणेशपूर, वणी, मोबाईल नंबर – 9420255618, 8087895618 वेळ: स. 10 ते सायं 7  वाजेपर्यंत संपर्क साधता येणार आहे.

लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या फॅक्टरीमध्ये विविध प्रकारचे फरसाण तसेच मिठाई तयार होतात. फॅक्टरी आउटलेट असल्याने ग्राहकांना ठोक आणि चिल्लर दरात विविध फरसाण व मिठाई खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी एकदा जरूर फॅक्टरी आउटलेटला भेट दयावी किवा मोबाईलवरून ऑर्डर दयावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

पत्ता-लक्ष्मी इंडस्ट्रीज फैक्टरी आउटलेट मुकुटबन रोड, नायरा पेट्रोल पंप जवळ, गणेशपूर, वणी, मोबाईल नंबर – 9420255618, 8087895618 वेळ: दु. 10 ते सायं 7  वाजेपर्यंत.
Email: [email protected]

Comments are closed.