संजय खाडे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष

दोन दिवसात संजय खाडे यांची ठरणार भूमिका

निकेश जिलठे, वणी: काँग्रेसचे संजय खाडे हे गेल्या 2 ते 3 वर्षांपासून वणी विधानसभा मतदारसंघात काम करीत होते. काँग्रेसमध्ये ते सर्वात प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यामुळे त्यांना तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. मात्र ही जागा शिवसेना (उबाठा) गटाला गेल्याने संजय खाडे यांची निराशा झाला. तिकीट शिवसेनेला गेल्याने संजय खाडे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागले आहे. सध्या आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, संजय देरकर व राजू उंबरकर अशी तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. जर संजय खाडे यांनी अपक्ष फॉर्म टाकल्यास लढतीत आणखी रंगत येईल व ही लढत चौरंगी होऊ शकते.

वणी हा काँग्रेसचा पारंपरिक गड आहे. 2004 वगळता 1989 पासून 2014 पर्यंत वणी मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळाला. ही जागा काँग्रेसला सुटणार आणि त्यातही संजय खाडे यांना तिकीट मिळणार अशी शक्यता वर्तवली जात होती. याचे कारण म्हणजे संजय खाडे यांनी अल्पावधीच मतदारसंघात प्रचंड लोकप्रियता मिळवली. विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम त्यांनी राबवले. एक विरोधी पक्ष म्हणून त्यांची भूमिका सर्वांपेक्षा उजवी ठरली. त्यांच्या आंदोलनामुळे काँग्रेस चांगलीच चार्ज झाली. मात्र त्यांना तिकीट नाकारल्याने काँग्रेसचा एक गट नाराज झाला आहे.

संजय खाडे यांची सध्या ‘नो कमेन्ट’
संजय खाडे यांच्या भूमिकेबाबत ‘वणी बहुगुणी’ने त्यांना विचारणा केली असता त्यांनी या विषयावर भाष्य करणे टाळले. मात्र येत्या दोन ते तीन दिवसात ते याबाबत निर्णय घेणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या भूमिकेवर विजयाचे गणित अवलंबून राहणार, असे मानते जात आहे.

खाडे यांनी शहरासह ग्रामीण भागातही चांगला होल्ड निर्माण केला आहे. त्यांचे जनहित केंद्र एक मास्टरस्ट्रोक ठरला होता. त्याद्वारे खेड्यापाड्यातील हजारो लोकांचे काम झाले. शहरातही त्यांनी विविध उपक्रम राबवले. त्यांच्याच नेतृत्त्वात या पंचवार्षिकमध्ये काँग्रेसद्वारा सर्वाधिक आंदोलन, निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे परिसरात सर्वात प्रभावी ठरणा-या कुणबी मतदारांमध्येही त्यांची चांगलीच लोकप्रियता आहे. संजय देरकर हे देखील कुणबी उमेदवार आहेत. जर संजय खाडे यांनी अपक्ष फॉर्म टाकल्यास लढतीत आणखी रंगत येईल व ही लढत चौरंगी होऊ शकते. त्यामुळे सध्या सर्वांचे संजय खाडे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Comments are closed.