विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील उकणी येथील खुल्या कोळसा खाणीच्या मुख्य मार्गावर मंगळवारी दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. वाघाचा मृत्यू नैसर्गिक की शिकार? याबाबत विविध चर्चेला उधाण आले होते. दरम्यान वाघाचा मृत्यू विजेचा धक्क्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. आज या संदर्भात अनेकांची चौकशी आली तसेच घटनास्थळावरून विद्युत साहित्य जप्त करण्यात आले आहे. मृत वाघाचे 13 नखे व दोन दात गायब असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे शिकारीचा संशय बळावला आहे. घटनास्थळावरून विजेचे साहित्य जप्त करण्यात आले.
मंगळवार 7 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास बोरवेलजवळील डीपीजवळ एक वाघ मृतावस्थेत दिसून आला. हा वाघ कुजलेल्या अवस्थेत होता. या वाघाचा मृत्यू 12 ते 13 दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज आहे. वाघाचे वय 3 ते 4 वर्षे असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अधिक माहिती उत्तरिय तपासणी अहवाल आल्यानंतर मिळणार आहे. दरम्यान वाघाचे नमुने घेण्यात आले व त्यानंतर वाघाचे शासकीय नियमानुसार दहन करण्यात आल्याची माहिती वनअधिकारी यांनी दिली.
आज काय झाले?
आज वनविभागाच्या टीमने घटनास्थळाजवळील विद्युत तार व डीपी जप्त केली आहे. तसेच उकणी येथील वेकोलि अधिकारी, कामगार, व प्रथम दर्शी कामगाराचे बयान नोंदवले आहे. वाघाच्या पंजाची 13 नखे गायब झाली आहेत. तसेच जबड्यातील मुख्य दोन दातसुद्धा गायब असल्याचे तपासणीत उघड झाले आहे. याचा तपास आता वनविभागाकडून केला जात आहे. प्रकरणाची चौकशी विक्रांत खाडे, सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी ए. यू. देशमुख करीत आहे.
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964
Comments are closed.