बहुगुणी डेस्क, वणी: हिवरा मजरा येथील एका युवा शेतक-याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रवीण उर्फ गणपत सुदाम ताजणे (35) असे मृत शेतक-याचे नाव आहे. प्रवीणच्या नावे 3 एकर तर त्याच्या वडिलांच्या नावे चार एकर शेती आहे. या शेतीतूनच तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. ऐन सणाच्या दिवशी घरातील कर्ता पुरुषाने जीवन संपवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी दिनांक 14 जानवारी रोजी प्रवीण हा शेतीच्या कामासाठी शेतात गेला होता. संध्याकाळी उशिरा पर्यंत तो घरी परत आला नाही. गावात कुठे असणार असे गृहित धरून त्याच्या कुटुंबीयांनी गावात शोध घेतला. मात्र तो गावातही आढळून आला नाही. अखेर त्याचे कुटुंबीय व नातेवाईक शेतात गेले. तिथे त्यांना प्रवीणने एका बोरीच्या झाडाला गळफास घेतल्याचे आढळले. त्याच्या कुटुंबीयांनी याची माहिती मारेगाव पोलिसांना दिली.
मारेगाव पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला. प्रवीणचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतक शेतकरी प्रवीण उर्फ गणपत यांचे पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, एक विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गर्शनाखाली जमदार भालचंद्र मांडवकर करीत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. सततच्या नापिकीमुळे प्रवीणने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे गावात बोलले जात आहे.
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964
Comments are closed.