बहुगुणी डेस्क, वणी: झरी तालुक्यातील झमकोला येथील एका तरुण शेतक-याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 21 मे रोजी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सूरज विनायक मेश्राम (24) असे आत्महत्या करणा-या शेतक-याचे नाव आहे. सूरज हा अल्पभूधारकर शेतकरी होता. तो शेती व मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. बुधवारी नेहमीप्रमाणे सूरज शेतात गेला. मात्र त्याने शेतातील एका झाडाला गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान त्याने गळफास घेतल्याचे काही लोकांच्या लक्षात आले. त्यांनी झाडाकडे धाव घेतली. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसले तरी सततच्या नापिकीमुळे आलेल्या आर्थिक अडचणीतून सूरजने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.