अंत्यविधीला गेले, चोरट्यांनी संपूर्ण घरच केले साफ !

सोन्याच्या दागिन्यांसह आयपॉड, घड्याळ, होम थिएटर व रोख रक्कम लंपास

बहुगुणी डेस्क, वणीवणीत पुन्हा एका धाडसी घरफोडी समोर आली आहे. दिनांक 3 ते 4 जुलैच्या दरम्यान जैन ले आऊट येथे ही घरफोडी झाली. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचे सोन्याचे दागिने, 20 हजार रुपये रोख रक्कम यासह आयपॉड, घड्याळ, होम थिएटर देखील चोरून नेला. कुटुंबातील व्यक्ती अंत्यविधीला बाहेर गेल्याने चोरट्यांनी डाव साधला.

फिर्यादी राहुल विनायक गौरकर (31) हे वणीतील जैन ले आऊट येथील रहिवासी असून ते वेकोलि बेलोरा येथील खाणीत नोकरीला आहे. शुक्रवारी दिनांक 3 जुलै रोजी स. 10 वाजता ते कुटुंबीयांसह भद्रावती येथील एका नातेवाईकांकडे अंत्यविधीसाठी गेले होते. दुस-या दिवशी संध्याकाळी ते अंत्यविधी आटपून घरी परतले. मात्र त्यांना घरातील मेन डोअरचा कुलूप कोंडा तुटलेला आढळला. ते घरात गेले असता त्यांना घरातील सर्व लाईट सुरु दिसले. घरातील सामान अस्तव्यस्त होते.

त्यांनी घरातील वस्तूंची पाहणी केली असता त्यांना घरातील सोन्याचे दागिने, होम थिएटर, घड्याळ, इअरफोन (आयपॉड) व घरातील 20 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे पावने दोन लाखांचा ऐवज गायब दिसला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घरी येऊन पंचनामा केला.

या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचे झुमके, सोन्याची अंगठी, सोन्याची रिंग, कानातील वेलदोर, सोन्याची जिवती, चांदीचे चाळ असे सुमारे दीड लाखांचे दागिने व इतर मुद्देमाल चोरून नेला. पोलिसांनी गौरकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 305 (अ) व 331 (4) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

लग्नाचा सिजन संपत आला पण घरफोडी सुरूच!
सध्या लग्नाचा सिजन संपत आलाये. मात्र शहरातील घरफोडीचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. या एकाच सिजनमध्ये चोरट्यांनी घरफोडी व दुचाकी चोरी करून कोट्यवधीचा मुद्देमाल लंपास केला आहे. जे लोक बाहेरगावी जातात. असे घर चोरट्यांच्या रडारवर आहेत. सध्या जे घर बंद असते ते घर फुटलेच असे एक समीकरण झाले आहे. आयुष्यभराची जमापुंजी चोरटे एका रात्रीत लंपास करीत आहे. घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लागत नसल्याने सध्या नागरिकांनीच सतर्क राहणे गरजेचे झाले आहे. पोलीस प्रशासनाने देखील बाहेरगावी जात असल्याची याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन केले आहे. सातत्याने होणा-या घरफोडीमुळे वणीकर चांगलेच दहशतीत आले आहे. 

शेवाळकर परिसर येथे ब्लॉक (व्यावसायिक गाळा) विकणे आहे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.