जुन्या वादातून चारचाकी वाहनाची काच फोडली

वणी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

वणी (विवेक तोटेवार): शहरातील सावरकर चौक परिसरात गुरुवार, 8 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास जुन्या वादातून दोन इसमांनी चारचाकी वाहनाची काच फोडल्याची घटना घडली. याप्रकरणी वणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी अब्दुल सादिक अब्दुल हमीद (34, रा. सावरकर चौक) यांच्या मालकीची महिंद्रा एक्सयूव्ही (MH 34 BV 9313) ही गाडी त्यांच्या भासा नेहान शेख वाहब शेख यांच्या नावावर आहे. अब्दुल यांनी गाडी पहाटे 4 वाजता घरासमोर उभी केली होती. पहाटे 5 वाजताच्या सुमारास गाडीच्या काचा फुटण्याचा आवाज आल्याने ते बाहेर आले असता गाडीची काच फोडलेली आढळली.

शेजाऱ्यांनी सांगितले की, मंगल खाडे (37, रा. मंगलम पार्क, चिखलगाव) आणि सय्यद मिनाज सय्यद मुमताज (35, रा. शास्त्री नगर, वणी) यांनी ही काच फोडली. यामुळे अब्दुल यांचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. अब्दुल यांनी पोलिसांना सांगितले की, यापूर्वीही मंगल खाडे यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, ज्याची तक्रार वणी पोलिसात नोंदवली गेली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याच जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत आहे. यावरून वणी पोलिसांनी मंगल खाडे आणि सय्यद मिनाज यांच्याविरुद्ध भादंवि कलम 324(2), 352, आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.

Comments are closed.