रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी, वणीचा अभिनव उपक्रम

गायींना रेडियमयुक्त कॉलर बेल्ट परिधान; अपघात रोखण्यासाठी पुढाकार

पुरुषोत्तम नवघरे, वणी :  नवरात्रोत्सवाच्या पवित्र प्रारंभीच्या दिवशी रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी, वणी तर्फे राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमामुळे शहरात व परिसरात कौतुकाचे वातावरण आहे. रस्त्यावर आणि महामार्गावर मुक्तपणे फिरणाऱ्या 100 हून अधिक गायींना रेडियमयुक्त कॉलर बेल्ट परिधान करून देण्यात आले.

या उपक्रमामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना गायी सहजपणे दिसतील आणि अपघात टाळण्यास मदत होईल. “गायींची सुरक्षा आणि वाहनचालकांचे प्राण वाचवणे हा या प्रकल्पामागचा मुख्य हेतू आहे,”असे अध्यक्ष लवलेश लाल यांनी सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या प्रकल्पाचे संचालक मयूर गेडाम असून, अश्विन कोंडावर, धनु अग्रवाल, जीतू फेरवानी, अनी यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व सदस्य व बजरंग दलाचे कार्यकर्ते विशाल दूधबडे, संतोष लक्षशेट्टीवार व त्यांच्या टीमने वणी शहरातील विविध गल्लीबोळांमध्ये तसेच महामार्गावर गायींना कॉलर बेल्ट परिधान केले.

समाजहिताचा आदर्श ठरत असलेला हा उपक्रम गायींच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Comments are closed.