बहुगुणी डेस्क, वणी : जागतिक महिला दिनानिमित्त शिरपूर येथे महिलांनी एकत्र येत उत्साहात कार्यक्रम आयोजित करून महिला दिन साजरा केला. या कार्यक्रमात महिलांनी नाटिका, नृत्य व विविध सांस्कृतिक कलेचे सादरीकरण करून आपल्या कला आणि सामर्थ्याचे दर्शन घडविले.
12 मार्च रोजी शिरपूर ग्रामपंचायत पटांगणावर महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुवर्णा बोंडे यांनी भूषविले, तर किरण देरकर प्रमुख उपस्थित म्हणून उपस्थित होते. यावेळी ज्योत्स्ना रामटेके, वेणु झोडे, सुरेखा ढेंगळे, सरपंच गणेश डाहुले, उपसरपंच मोहित चचडा आणि तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रमोद मंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात गावातील महिला व मुलींनी नाटिका, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. महिला दिनानिमित्त किरण देरकर, सुवर्णा बोंडे आणि उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडत महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुमती बोधे यांनी केले. सूत्रसंचालन आशू मत्ते यांनी केले तर आभार सोनू रामटेके यांनी मानले.

या कार्यक्रमाला मनीषा ठमके, मयुरी बोधे, कोमल ठावरी, मनीषा बोधे, नंदा डवरे, लता फेथफुलवार, लता गोरे, शांताबाई सलाम, कांचन ठाकरे, ज्योती खोबरे, संगीता ननकटे, वृंदा मंदे, माधुरी मंदे, प्रेमाली निकोडे, शितल गोरे, अर्चना ननकाटे, ललिता सिडाम, जया खोबरे, काजल गणवीर यांच्यासह गावातील अनेक महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



Comments are closed.