डॉ. रोहित वनकर यांची जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती

यवतमाळ जिल्ह्यात करिअर कट्टा उपक्रमासाठी नवी जबाबदारी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमासाठी यवतमाळ जिल्हा समन्वयक म्हणून नूरजहाँ बेगम सलाम अहमद आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रोहित सुधाकर वनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केली. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डॉ. वनकर यांनी या नियुक्तीचे श्रेय महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, सचिव डॉ. राणानूर सिद्धिकी, प्राचार्य डॉ. अविनाश घरडे, ऍड. निलेश चौधरी, डॉ. दिनेश खेडकर आणि डॉ. प्रवीण कुलकर्णी यांना दिले आहे.

Comments are closed.