विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पहाटे घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली महिला

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वागदरा (नवीन) येथील एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज बुधवारी दिनांक 8 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मनिषा रवि बोथले (41) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत मनिषा ही तिच्या कुटुंबीयांसह नवीन वागदरा येथे राहत होती. तिचे पती ट्रक चालक आहे. आज पहाटे मनिषा ही घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. मनिषा यांच्या पश्चात पती व दोन अपत्य आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.