विवेक तोटेवार, वणी: थंडीची चाहुल लागत आहे. लवकरच दिवाळी सारखा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. मात्र या सणावारांच्या दिवसांत काही वयोवृद्ध आणि गरिब मुलांच्या अंगावर फाटके कपडे असतात. थंडीच्या दिवसांत त्यांना कुडकुडत आयुष्य काढावं लागतं. अशा गरजू लोकांना लोकांनीच मदत करावी या उद्देशाने स्वेटर, ब्लेंकेट, स्कूलबॅग इत्यादी वस्तू दान करण्याचं आवाहन जेसीआयतर्फे करण्यात आलं आहे.
जेसीआय ही सामाजिक संस्था नेहमी सामाजिक उपक्रमात सहभागी असते. दरवर्षी दिवाळीच्या काळात या संस्थेकडून स्वेटर, ब्लँकेट, कपडे, साड्या, स्कूलबॅग, खेळणे इत्यादी गोळा केले जाते व त्याचे गरजुंना वाटप केले जाते. यावर्षी 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत हे साहित्य गोळा केले जाणार आहे.
अनेकांकडे जुने कपडे, स्वेटर इत्यादी वापरात नसलेल्या वस्तू असतात. त्या कपाटामध्ये तशाच पडून असतात. तर दुसरीकडे मात्र अनेक गरजुंना परिस्थितीमुळे फाटके कपडे घालावे लागतात. तर थंडीच्या काळात अनेकांना कुडकुडत हिवाळा काढावा लागतो. अशा लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने ज्या लोकांकडे सुस्थितीतील स्वेटर, ब्लँकेट, स्कूलबॅग, खेळणे, साड्या इत्यादी वापरात नसलेल्या वस्तू आहेत. अशा वस्तू दान करण्याचे आवाहन जेसीआयने केले आहे. गोळा केलेल्या या सर्व साहित्याचं 3 नोव्हेंबरला हनुमान मंदिर जत्रा रोड येथे गरजुंना वाटप केले जाणार आहे.
सुस्थितीत असलेले ब्लँकेट, स्वेटर, स्कूलबॅग कपडे, साड्या इत्यादी साहित्य स्वच्छ धुवून इस्त्री करून इच्छुकांना प्रज्योत ज्वेलर्स जुनी स्टेट बँख रोड, स्वामी समर्थ कॉम्प्युटर प्रिंटर्स, बाजोरिया लॉन नागपूर रोड, हॉटेल रसोई आर के हाईट्स इत्यादी ठिकाणी दान करता येणार आहे.
तसेच घरी येऊन या वस्तू गोळा केल्या जाणार आहे. यासाठी 9175280000 या नंबर वर कॉल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कॉल केल्यानंतर संस्थेचे स्वयंसेवक स्वतः या वस्तू घेण्यासाठी घरी भेट देईल.
हा उपक्रम अनेक गरजुंच्या चेह-यावर आनंद फुलवणारा असून या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन जेसीआय तर्फे कऱण्यात आले आहे.