सकाळी 10 वाजताचा शो फक्त 80 रुपयांमध्ये, सुजाता थिएटरची नवीन ऑफर

बहुगुणी डेस्क, वणी: आपल्या आवडत्या सुजाता थिएटरमध्ये हा आठवडा 4 नव्हे तर 5 शो बघता येणार आहे. सोबतच पहिला शो हा सकाळचा 10 वाजताचा असणार असून विशेष म्हणजे हा शो प्रेक्षकांना अवघ्या 80 रुपयांमध्ये बघता येणार आहे. यात प्रेक्षकांना हव्या त्या क्लासमध्ये हव्या त्या सिटवर बसण्याची मुभा आहे. फक्त सकाळी 10 वाजताच्या शोसाठी ही ऑफर राहणार असून केवळ एकच आठवडा ही ऑफर राहणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

सध्याचा सर्वात चर्चित सिनेमा केरला स्टोरीचा सुजाता थिएटरमध्ये 3 रा सप्ताह सुरू आहे. हा सिनेमा स. 10 व सं. 6.15 वाजता बघता येणार आहे. तर तर X फास्ट या सिनेमाचे रोज 4 शो होणार आहे. दु. 12.45, दु. 3.50 व रा. 9.15 वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना बघता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे. त्यामुळे तातडीने आपली सीट बुक करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

केरला स्टोरी सध्या देशभरात चांगलाच चर्चेत असलेला सिनेमा आहे. हा सिनेमात केरळमधून आयसीस या अत्यंत क्रुर अशा दहशतवादी संघटनेत सामिल झालेल्या तरुणीची कथा दाखवण्यात आली आहे. या सिनेमामुळे सध्या चर्चेला उधाण आले असून काही राज्यात हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे तर पश्चिम बंगाल मध्ये हा सिनेमा बॅन करण्यात आला आहे. सध्या या सिनेमाने देशभरात रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे.

 

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.