निकेश जिलठे, वणी: शुक्रवारी रात्री नांदेपे-या जवळ एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. सचिन मधुकर मडावी वय अंदाजे ३८ वर्षे रा. वनोजादेवी असे मृताचे नाव आहे. आज शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने सचिन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडला आणि कपाळमोक्ष होऊन त्याचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सचिन मधुकर मडावी हा वनोजा देवी येथील रहिवासी होता. तो एसटी महामंडळात नोकरीला होता. प्रकृती अस्वस्थतेमुळे तो सध्या घरीच होता. शुक्रवारी दिनांक 24 जानेवारी रोजी रात्री तो त्याच्या दुचाकीने (MH 34 AC 9424) कामानिमित्त बाहेर गावी गेला होता. रात्री काम संपल्यावर तो वनोजा देवी येथे पोहोचत होता. दरम्यान त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व तो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडला.
रात्रभर होता तडफडत?
रात्रीची वेळ असल्याने सचिन कुणाच्याही दृष्टीस पडला नाही. त्यामुळे त्याला रात्री कुणाचीही मदत मिळाली नाही. रात्रभर जखमी अवस्थेतच तो पडून राहिला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आज आज पहाटे नांदेपेरा गावातील काही नागरिकांना सचिन मडावी हा दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडून दिसला. त्यानंतर अपघात झाल्याचे उघडकीस आले.
लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत सचिनला ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठवण्यात आला आहे. अपघात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाला की कुणी धडक दिली याचा तपास जमादार अविनाश बनकर करीत आहे.
Comments are closed.