खुशखबर – लॉयन्स कॉलेजमध्ये बी.एस.सी., बी.कॉम. प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरु

तज्ञ प्राध्यापक, प्रशस्त इमारत, अत्याधुनिक लॅब व संगणक कक्ष

बहुगुणी डेस्क : वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित वणी लॉयन्स वरिष्ठ महाविद्यालय मध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी बी.एस.सी. (प्रथम वर्ष) व बी. कॉम. (प्रथम वर्ष) इंग्रजी माध्यम अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. लॉयन्स वरिष्ठ महाविद्यालयाचे हे पहिले वर्ष असून वरील दोन्ही अभ्यासक्रमासाठी किमान वार्षिक फी घेऊन प्रवेश दिले जात आहे.

वणी परिसरात सद्य एकाच महाविद्यालयात बी.एस.सी. व बी.कॉम. अभ्यासक्रम सुरु आहे. या महाविद्यालयात मर्यादित सीटमुळे तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना नाईलाजाने दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा लागत होता. त्यामुळे वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टतर्फे यावर्षी वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. वरिष्ठ महाविद्यालयात अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेपेरा मार्गावरील लॉयन्सच्या मालकीच्या प्रशस्त व भव्य क्रीडांगण असलेल्या इमारतीत हे महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. सुसज्ज व अत्याधुनिक प्रयोगशाळा, इंटरनेट सुविधासह अद्यावत संगणक कक्ष व उत्कृष्ट लायब्ररी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बी.एस.सी. व बी. कॉम. (प्रथमवर्ष) अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी वणी लॉयन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज देशमुखवाडी, वणी व लायन्स वरिष्ठ महाविद्यालय, नांदेपेरा रोड वणी, जि. यवतमाळ या शाखेत त्वरित संपर्क साधावा किंवा सकाळी 9.00 वा. ते दु. 2.00 पर्यंत प्रत्यक्ष भेट देऊन प्रवेश सुनिश्चित करा. असे आवाहन वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहिती व प्रवेशासाठी –
9767306997, 8999681525, 8888717938  या क्रमांकावर संपर्क करा.

Comments are closed.