कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

"राष्ट्रीय कृषी बाजार" (e-NAM) अप्लिकेशन बद्दल दिली माहिती

सुशील ओझा, झरी: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित असलेले ‘कृषी महाविद्यालय, कोंघारा’, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2021-22 अंतर्गत विद्यार्थी हितेश ज्ञानेश्वर गेडाम यांच्या पुढाकाराने केळापूर तालुक्यातील कोंघारा या गावामध्ये शेतकऱ्यांना ‘राष्ट्रीय कृषी बाजार ‘ (e- NAM) बद्दलचे महत्त्व सांगितले.

त्यामध्ये राष्ट्रीय कृषी बाजार अप्लिकेशन ची नोंदणी कशा पद्धतीने करावी, त्याचे शेतकऱ्यास होणारे फायदे, ती अप्लिकेशन कशा पद्धतीने वापरावी आणि राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM) अप्लिकेशन मध्ये खरेदी-विक्री पारदर्शक पद्धतीने कशी करावी तसेच बाकीचे/बेकायदेशीर खर्च संपुष्टात आणून योग्य प्रकारे हमीभाव कसा मिळवावा, ई. बद्दल विद्यार्थ्याने सविस्तर माहिती सांगितली.

माहिती कार्यक्रमा दरम्यान गावातील शेतकरी उमेश वड, ज्ञानेश्वर गेडाम, विलास गेडेकार, विनोद हिवरकर, सरपंच दिनेश गेडाम, तसेच ग्रामपंचायत कोंघारा येथील सदस्य, आदि उपस्थित होते.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश राठोड, कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल भाकडे, कृषी अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. शुभम शिरपूरकर, प्रा. दत्ता जाधव, प्रा. हेमंत वानखेडे, प्रा. अजय सोळंकी, प्रा. पल्लवी येरगुडे, प्रा. काजल माने, आदि शिक्षकांचे या विध्यार्थ्याला मार्गदर्शन लाभले.

Comments are closed.