शुल्लक कारणावरून शेतक-यावर कुऱ्हाडीने हल्ला

डोर्ली येथील घटना, शिरपूर ठाण्यात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: एक इसमाने शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दुस-या इसमावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले. तालुक्यातील डोर्ली या गावात ही घटना घडली. जखमीच्या तक्रारीवरून शिरपूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमेश्वर बापूराव सिडाम (42) रा. डोर्ली हे शेती करतात. 15 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास आपल्या शेतातून दुचाकीने घरी जात होते. दरम्यान धूनकी ते डोर्ली रोडवर गावाजवळ सखाराम पंधरे (62) हा जंगलातून बकऱ्या घेऊन परत जात होता. रस्त्यावर बक-या आल्याने सोमेश्वरला दुचाकी घेऊन जाण्यास अडथळा येते होता. त्यामुळे सोमेश्वर यांनी सखाराम याला तुझ्या बकऱ्या बाजूला कर म्हणून सांगितले.

याचा सखारामला राग आला. त्याने कुऱ्हाडीने सोमेश्वर यांच्या डोक्याव कानाच्या व डोळ्याच्या मध्ये वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान यावेळी सोमेश्वर यांचा नातेवाईक अजय शेडमाके हा घटनास्थळी आला. त्याने सोमेश्वरला ऑटोने शिरपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. परंतु तेथून त्यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सोमेश्वर यांच्या तक्रारीवरून शिरपूर ठाण्यात आरोपी सखाराम धर्मा पंधरे यांच्याविरोधात कलम 118 (2) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घेटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

Comments are closed.