पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतिवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके आणि विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राजूरला होत आहे. या निमित्त राजूर येथील बिरसा भूमीवर शनिवार दिनांक 05 एप्रिलला सकाळी 9.00 वाजल्यापासून विविध कार्यक्रम आरंभ होतील.आदिवासी जनजागृती युवा संघटना व वीरांगना राणी दुर्गावती महिला संघटना यांनी या निमित्त एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शनिवारी सकाळी 9.०० वाजता आदिवासी संस्कुतीनुसार निसर्ग पूजन म्हणून गोंगो पूजा व आदिवासी ध्वजाचे पूजन होईल. त्यानंतर सायं. 7 वाजता आमदार संजय देरकर कार्यक्रमाचे करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार जुमनाके राहतील.
या कार्यक्रमाला प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. महेंद्र लोढा, सहपोलिस निरीक्षक नीलेश अपसुंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत, उपसरपंच अश्र्विनी प्रकाश बल्की, माजी सरपंच प्रणिता मो. असलम, भांदेवाडाच्या सरपंच संगीता विजय गोबाडे, पोलीस पाटील वामन पा. बल्की, सामाजिक कार्यकर्ता विजय पेंदोर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील.
त्यानंतर सायं 7.30 वाजता क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर आधारित एकपात्री प्रयोग रामचंद्र आत्राम सादर करतील. त्यानंतर रात्री 8 वाजता गोंडी व भीमगीतांचा कार्यक्रम आदिवासी गोंडी ऑर्केस्ट्रा बल्लारपूर व संच सादर करणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती आदिवासी जनजागृती युवा संघटनेचे ॲड. अरविंद सिडाम, मारोती आत्राम, रामकृष्ण सिडाम, रोहित किनाके यांनी केली आहे.
Comments are closed.