चोरट्यांनी चोरली पोकलँड मशिनची बॅटरी, टूलकीट

रस्त्यावर उभे ठेवलेल्या मशिनमधले डिझेलही केले लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: एका कारखान्या समोर असलेल्या रोडच्या कामासाठी लावलेल्या पोकलँड मशिनमधून चोरट्यांनी बॅटरी, टूलकीट चोरून नेली. चोरटे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी मशिनमधले डिझेल देखील चोरून नेले. 17 सप्टेंबर रोजी रात्री पावने 11 च्या सुमारास ही घटना घडली. सुमारे 40 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

फिर्यादी विशाल मनोहर किन्हेकर (34) हे मारेगाव येथील रहिवासी आहे. त्यांच्या मालकीची एक जेसीबी व एक पोकलँड मशिन आहे. पोकलँड मशिनवर नरेंद्र मडावी (25) रा. नरसाळा ता. मारेगाव हा चालक म्हणून काम करतो. दिनांक 15 सप्टेंबर रोजी त्यांनी त्यांची पोकलँड मशिन शिरगीरी पोड, 18 नंबर पुल येथे एका रस्त्याच्या कामासाठी पाठवली होती. दुस-या दिवशी संध्याकाळी चालकाचा विशाल यांना फोन आला. चालकाने उद्या कामाला येणार नाही व पोकलँड मशिन 18 नंबर पुलाजवळ ठेवल्याचा निरोप मालकाला दिला.

मशिनमध्ये एक गॅजेट लावले आहे. या गॅजेटमुळे मशिनमधली काही वस्तू काढल्यास त्याचा मोबाईलवर मॅसेज येतो. 17 सप्टेंबर रोजी रात्री पावने 11 वाजताच्या सुमारास विशाल यांना मोबाईलवर पोकलँड मशिनची बॅटरी काढल्याचा मॅसेज आला. बॅटरी चोरून नेल्याचे कळताच दुस-या दिवशी सकाळी ते पोकलँड ठेवलेल्या ठिकाणी गेले. तिथे त्यांना मशिनचा बॅटरी बॉक्स तोडलेला आढळला तसेच आतमधली टूलकीट व पोकलंडच्या पिना नसल्याचे आढळून आले. त्यांनी डिझेल चेक केले असता चोरट्यांनी डिझेल देखील चोरल्याचे लक्षात आले.

या घटनेत चोरट्यांनी दोन बॅटरी किंमत अंदाजे 10 हजार, टूलकीट (पाने, बकेट, 2 पिन वजन प्रत्येकी 25 किलो) किंमत 20 हजार रुपये, 220 लीटर डिझल किंमत 10 हजार रुपये असा सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी विशाल किन्हेकर यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

चोरट्याने लंपास केली बचतगटाची रक्कम व सोन्याचे दागिने

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.