आधी दोन बाईकची धडक, नंतर त्याच बाईकची ट्रकला धडक

राज्य महामार्गावरील गौराळा फाट्याजवळील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: बाईकची बाईकला किंवा ट्रकला धडक ही सामान्य घटना आहे. दोन सारख्या किंवा भिन्न वाहनांच्या धडकी होतात. मात्र राज्य महामार्गवरील गौराळा फाट्याजवळील झालेला अपघात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या विचित्र अपघाताने सगळ्यांनाच पेचात पाडले आहे.

या अपघातात दुचाकीने वणीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने आधी समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. आणि नंतर लगेच समोरून येणाऱ्या ट्रकलादेखील धडक दिली. हा अपघात आज शुक्रवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास झाला. या अपघातात हातगाव पिंपरी येथील प्रथमेश भास्कर बोढाले (22) आणि मारेगावचे पोलीस जमादार भालचंद्र मांडवकर असे दोघे बाईकस्वार जखमी झालेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रथमेश हा काही कामासाठी बाईकने वणीला निघाला. गाडी चालवताना त्याचे नियंत्रण सुटले. समोरून येणाऱ्या पोलीस जमादार भालचंद्र मांडवकर यांच्या बाईकला त्याच्या बाईकने धडक दिली. थोडं पुढं जात नाही तोच प्रथमेशची बाईक समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. या विचित्र अपघातात प्रथमेशच्या डोक्याला जबर इजा झाली.

तर आपल्या बाईकवरून पडल्याने मांडवकर यांचा हात फ्रॅक्चर झाला.अपघातानंतर सर्वप्रथम दोन्ही जखमींना मारेगाव येथील रुग्णालयात आणले. तिथे प्राथमिक उपचारानंतर प्रथमेश यास नागपूरला तर मांडवकर यांना वणीला रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. या विचित्र अपघाताची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Comments are closed.