रजा अकादमीवर बंदी घाला, भाजपची मागणी

दंगल घडवणा-यांना अटकेच्या मागणीसह पोलीस कार्यवाहीचाही निषेध

जितेंद्र कोठारी, वणी: त्रिपुरा मधील तथाकथिक घटनेवरून मालेगाव, अमरावती, नांदेड, पुसद या शहरात दंगल घडविणाऱ्या मुख्य सुत्रधाराला अटक करा. तसेच या सर्व प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मार्फत सखोल चौकशी करा. तसेच दंगलीस जबाबदार असलेल्या रजा अकादमीवर बंदी घाला, अशी मागणी वणी तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

त्रिपुरा मध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र काही समाजविघातक संस्थांनी सोशल मीडियावरून अफवा पसरवून वातावरण दुषीत केले. त्याआधारे मालेगाव, अमरावती, नांदेड व पुसद शहरात जातीय दंगल घडविण्यात आली. दंगलीत जमावाने दुकाने, कार्यालये तसेचे वाहनांचे मोठे नुकसान केले. या शहरामध्ये दंगल घडवून आणण्यासाठी रजा अकादमी ही संघटना जवाबदार असून संस्थेवर बंदी लावण्याची मागणी भाजपने केली आहे.

दंगल करणाऱ्याना सोडून स्वरक्षणसाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवर पोलीस कार्यवाहीचाही भाजप वणी शाखाने निषेध केला आहे. स्वरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरणाऱ्या नागरिकांवर सुरु असलेली पोलीस कार्यवाही थांबविण्याची मागणी भाजपने केली आहे.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा महामंत्री रवी बेलूरकर, पं. स. सभापती संजय पिंपलशेंडे, भाजप तालुकाध्यक्ष गजानन विधाते, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, श्रीकांत पोटदुखे यांच्या सह्यनिशी निवेदन उपविभागीय अधिकारी वणी मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आला आहे.

हे देखील वाचा:

उमेद पार्क येथे नवीन ड्युप्लेक्स/बंगला विकणे आहे

सरपंच जे करू शकते ते पंतप्रधान नाही: भास्कर पेरे पाटील

Comments are closed.