उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा

जितेंद्र कोठारी, वणी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस शनिवार 22 जुलै रोजी भारतीय जनता पक्षातर्फे ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. रायगड मधील इर्शाळवाडी भागात दरड कोसळल्याची घटनेच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कुठेही शुभेच्छा होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर न लावता लोकांची सेवा करण्याचे आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहे.

वणी शहरात सेवा दिनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सकस आहार वाटप करून उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना वर्ष भर दूध, बिस्कीट व सकस आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, दिगांबर चांदेकर, तालुकाध्यक्ष गजानन विधाते, महिलाध्यक्ष स्मिता नांदेकर तसेच शहर, तालुका महामंत्री, युवामोर्चा अध्यक्ष, आघाडीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.