रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान

प्रजासत्ताक दिनी स्माईल फाउंडेशनचा उपक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: येथील स्माईल फाउंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल रुक्मिणी सभागृहात आयोजित या शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले. रक्तसंकलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रूग्णालय चंद्रपूर येथील चमूद्वारे करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच लोकनायक बापूजी अणे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून रक्तदान शिबाराला  सुरुवात करण्यात आली. रक्तदान शिबिराच्या अध्यक्षस्थानी वणी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असोसिएशनचे सचिव संजय निमकर, प्रमुख पाहुणे म्हणून नगर सेवा समितीचे अध्यक्ष दिलीप कोरपेनवार, समाजसेवा अधीक्षक पंकज पवार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश बोबडे, डॉ. सचिन दुमोरे, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त सुरेश बनसोड, ‘एक हात माझा मदतीचा’ संस्थेच्या अध्यक्ष अर्चना बोदाडकर, स्माईल फाउंडेशनचे उपाध्यक्ष पियुष आत्राम उपस्थित होते.

रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव, पीयूष आत्राम, आदर्श दाढे, विश्वास सुंदराणी, उत्कर्ष धांडे , खुशाल मांढरे, सचिन जाधव, तन्मय कापसे, गौरव कोरडे, दिनेश झट्टे, कुणाल आत्राम, कार्तिक पिदूरकर, सचिन काळे, हर्ष ओझा, तुषार वैद्य, युग बोबडे, आदित्य चिंडालिया यांनी परिश्रम घेतले .

Comments are closed.