मुकुटबन येथे पोळ्यानिमीत्य बैल सजावट स्पर्धा संपन्न
सजवलेले बैल वेधून घेत होते उपस्थितांचे लक्ष
देव येवले, मुकुटबन: मुकुटबनमध्ये पोळा उत्सव समिति तर्फे उत्कृष्ट बैल जोड़ी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात प्रथम पारितोषिक गंभीर जिन्नावार, द्वितीय पारितोषिक उल्हास मंदावार, तृतिय पारितोषिक हनुमान कल्लुरवार, तर चतृर्थ पारितोषिक रमेश पुल्लीवार यांना मिळाले. याशिवाय मुरलीधर तिपत्तीवार यांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आलं. यांना अनुक्रमे 5 हजार, 3 हजार, 2 हजार आणि हजार रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलं.
मुकुटबनमध्ये दरवर्षी पोळ्यानिमित्य बैल सजावट स्पर्धा घेतली जाते. यावर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. शेतक-यांना सजवलेले बैल सर्वांच लक्ष वेधून घेत होते. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतक-यांच्या बैलजोडीचे निरिक्षण पोळा समिति द्वारे करण्यात आले. बक्षीस पात्र जोडीस वेगळे उभे करून विजेत्यांची नावं राखून ठेवण्यात आले होते.
(हे पण वाचा: विद्यार्थ्यांसाठी धावले दोन आमदार, पण स्थानिक आमदार गायब)
पोळा फुटल्यानंतर समितीच्या सदस्यानी विजेत्यांची नावे जाहीर केली. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रा.पं. सरपंच-उपसरपंच, सदस्य, पोळा समिती व गावकरी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. प्रसंगी पोलीस बंदोबस्त असल्यानं कुठलीही घटना घडली नाही. ही स्पर्धा अतिशय शांततेत व सुव्यवस्थेत मोठ्या उत्साहात पार पडली.