गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी वणीतील अभय पारखी

गणितविषयी गोडी निर्माण करण्यासाठी भविष्यात विविध कार्यक्रम राबवणार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: यवतमाळ जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी वणीतील राजश्री शाह महाराज हिंदी विद्यालयाचे शिक्षक अभय पारखी यांनी निवड करण्यात आली आहे. रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी यवतमाळ जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा यवतमाळ जिल्हा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात पार पडली. ही सभा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष विनोद संगीत राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सहविचार सभेत यवतमाळ जिल्हा गणित अध्यापक मंडळाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

उपाध्यक्षपदी बंडू खराटे (पुसद), मंगेश येवतीकर (नेर), सचिव पदी सचिन देशपांडे (यवतमाळ), कोषाध्यक्ष युवराज गेडाम (कळंब), प्रसिद्धीप्रमुख राजेश वाघमारे (केळापूर), महिला प्रतिनिधी ममता जोगी (झरी जामणी), मंदा पान्हेकर (पुसद), तर सदस्य म्हणून गणेश सोनार, यवतमाळ. रवींद्र साळवे, मारेगाव. विशाल ढोले, दिग्रस. संजय चिरडे, राळेगाव. मोहम्मद रफीक मोहम्मद युसुफ शेख, आर्णी. विनोद पवार, मारेगाव. प्रणव पुरी, उमरखेड. सुधीर धांडे, घाटंजी. अभिजीत काशीकर, बाभूळगाव. बालाजी घाटगे, महागाव. शहजाद अहमद शाह, यवतमाळ यांची निवड करण्यात आली.

विविध कार्यक्रम राबवणार – अभय पारखी
गणित हा विषय रंजक असला तरी विद्यार्थ्यांना तो किचकट वाटतो. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गणित सोप्या व प्रभावी पद्धतीने पोहोचवण्याकरिता भविष्यात विविध कार्यक्रम राबवले जाईल. अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष अभय पारखी यांनी दिली.

मार्गदर्शक म्हणून विनोद संगीतराव, विजय विसपुते, प्रदीप जतकर, अनिस खान, गजानन चिंतावार, नागोराव चौधरी, सतीश काळे, राजेश पोटे यांची निवड करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विजय विसपुते यांनी केले. नवनियुक्त कार्यकारणीचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार सतीश काळे यांनी मानले. 

Comments are closed.