केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा स्नेहमिलन सोहळा संपन्न

सोहळ्यात विविध स्पर्धेचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: शहरातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन वणीच्या वतीने शनिवार 14 जानेवारी रोजी कौटूंबिक स्नेहमिलन सोहळा वणी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे घेण्यात आला. केमिस्ट कुटुंबीयांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता हा स्नेहसंमेलन सोहळा घेण्यात आला होता. या सोहळ्यात रांगोळी, गीत गायन, भरतनाट्यम, हजीर सो वजीर लक्की ड्रॉ इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रमन जी अग्रवाल (महा-कार्यकारी सदस्य) होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक संजय पिपंळखूटे (अमरावती झोन अध्यक्ष) होते. पंकज नानवानी, गजानन बट्टावार, दिपक कोकाटे, विजय बनगीनवार, उमेश वाधवानी, सूधीर वाधवानी, पप्पू नानवानी, लक्ष्मण उरकूडे (शहर अध्यक्ष), सविता दातीर (औषधी निरिक्षक), संजय बूरूले, बाबाराव बोबडे, उज्वल पांडे, जितेद्र डाबरे यांची या कार्यक्रमला प्रमुख उपस्थिती होती.

असोसिएशनच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे सचिव जितेंद्र डाबरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार लक्ष्मण उरकूडे यांनी मानले. यावेळी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे तालूक्यातील व शहरातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!