अखेर नरसाळ्यातील दोन अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी पकडून दिले
नरसाळा येथील घटना, झाल्यात एकाच दिवशी दोन कारवाया
नागेश रायपुरे, मारेगाव: तान्ह्यापोळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नरसाळा येथे आज दोन अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी पकडून पोलिसात दिले. मारेगाव पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून देशी दारूच्या बाटल्यांसह मुद्देमाल जप्त केला आहे.
कारवाई करण्यात आलेले आरोपी गेल्या अनेक महिन्या पासून नरसाळा येथे अवैध दारू विक्री करत होते. गावातील महिलांनी त्याविरोधात मारेगाव पोलिसात निवेदनसुद्धा दिले होते. आज तान्ह्यापोळ्याच्या पार्श्वभूमीवर नरसाळा येथील महिलांनी 11.30 ते 12 वाजताच्या दरम्यान पहिल्या कारवाईत आरोपी लोकेश सुनील रामटेके(26) हा अवैधरीत्या देशी दारू विकत असताना रंगेहात पकडला. त्याच्याकडून देशी दारूचे 180 ML चे 18 नग असा एकूण 1800 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत दुपारी 1 वाजता दरम्यान आरोपी राजू पतरु तोडसे (30) यांच्याकडून देशी दारूचे 90 MLच्या 20 बाटल्या असा एकूण 1000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही घटनांतील आरोपींवर 65 (E) मदाकानुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई पो. नि. जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात जमादार आनंद अचलेवार, गजेंद्र मेश्राम यांनी केली.